पुण्यातील ISIS मॉड्युल प्रकरणी ATS ची मोठी कारवाई; कोंढव्यातून दहशतवाद्याला अटक
- Published by:Prachi Amale
Last Updated:
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून करण्यात आली आहे
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) आज पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी कारवाई केली आहे. तब्बल दहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत जुबेर हंगरगीकर नावाच्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून करण्यात आली आहे
advertisement
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIAने आयसिसशी संबंधित पुणे मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई केली. झुबेर हंगरगेकर अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 9 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्यात विविध ठिकाणी ATS ने केली छापेमारी होती. याच प्रकरणी ATS ने एकाला अटक केली होती.
पुढील तपास सुरू
एका दहशतवादाशी संबंधित प्रकरणात, महाराष्ट्र एटीएसने 9 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्यात विविध ठिकाणी शोधमोहीम केली. या कारवाईत अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू , कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले. तपासादरम्यान उघडकीस आलेल्या पुराव्यानुसार बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) अधिनियम, 1967 (सुधारित 2008) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या नोंदीनंतर, 27 ऑक्टोबर 2025 रोजी एटीएस ने पुण्यात एका व्यक्तीस अटक केली. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.
advertisement
2023 मध्ये पुण्यात उघडकीस आलेल्या ISIS-संबंधित
पुण्यात करण्यात आलेली ही कारवाई 2023 मध्ये पुण्यात उघडकीस आलेल्या ISIS-संबंधित दहशतवादी कारवायाशी होती. ज्या प्रकरणात मुंबई, पुणे आणि गुजरातमधील काही भागांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला गेला होता. त्या आरोपाखाल अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली होती. तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती ती म्हणजे आरोपींनी कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्ब चाचणी घेतली होती. त्यांच प्रशिक्षण कोंढवा परिसरात झालं होत. बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेवून घातपात करण्याचा त्यांचा डाव होता त्यातील एकाला आज पुणे एटीएसने अटक केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 27, 2025 8:52 PM IST


