कॅप्शनमध्येच दिली प्रेमाची कबुली
किर्तीने तिच्या इंस्टाग्रामवर एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या रीलमध्ये किर्ती आणि राजीवचे अत्यंत खाजगी आणि सुंदर क्षण टिपण्यात आले आहेत. कुठे हे दोघे कारमध्ये सेल्फी घेताना दिसतायत, तर कुठे प्रवासादरम्यान एकमेकांच्या सोबतीचा आनंद घेताना. एका फोटोत तर किर्ती प्रेमाने राजीवच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसतेय.
advertisement
व्हिडिओच्या शेवटी खिडकीवर काढलेलं एक हृदय आणि त्याला छेदणारा बाण बरंच काही सांगून जातो. किर्तीने या पोस्टला कॅप्शन दिलंय, "एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचं असतं... हॅपी न्यू इयर #Happy2026." या एका ओळीने तिने तिचे आणि राजीवचे नाते ऑफिशियल केले आहे.
ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आता ऑफ-स्क्रीन!
किर्ती आणि राजीवची ओळख अमेझॉन प्राईमच्या गाजलेल्या 'फोर मोर शॉट्स प्लीज' या वेबसीरीजच्या सेटवर झाली. मालिकेत किर्तीने 'अंजना' तर राजीवने 'मिहिर' ही भूमिका साकारली होती. डिसेंबर २०२५ मध्ये म्हणजेच सीरीजच्या चौथ्या सीझनच्या प्रदर्शनानंतर या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांनी काही फोटो शेअर केले होते, तेव्हापासूनच चाहत्यांना संशय होता की या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय.
घटस्फोटानंतर किर्तीने प्रेमाला दिली दुसरी संधी
किर्ती कुल्हारीच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा चढ-उतार आला होता. २०१६ मध्ये तिने अभिनेता साहिल सहगलसोबत लग्न केलं होतं, मात्र २०२१ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. या अनुभवाने आपल्याला भावनिकदृष्ट्या अधिक खंबीर बनवलं असल्याचं किर्तीने तेव्हा सांगितलं होतं. आता ४० व्या वर्षी पुन्हा एकदा स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्या राजीव सिद्धार्थमध्ये तिला आपला जोडीदार सापडला आहे, ही तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे.
सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव
किर्तीच्या या पोस्टवर तिची सहकलाकार मानवी गागरू हिने "हॅपी न्यू इयर, लव्हलीज" अशी कमेंट करून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी तर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एकाने लिहिलंय, "अंजना आणि मिहिर एका समांतर विश्वात एकत्र आले," तर दुसऱ्याने म्हटलंय, "तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला!"
