TRENDING:

Aadesh Bandekar: 'सूनबाई गालातल्या गालात हसतायेत...' ; आदेश बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती..! VIDEO मध्ये दिसली भावी सूनेची झलक

Last Updated:

Aadesh Bandekar: बांदेकर कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बांदेकर कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे बांदेकरांच्या घरची सून कोण होणार आहे याची जोरदार चर्चा होती. अशातच एका अभिनेत्रीचं नाव खूप चर्चेत होतं ते म्हणजे, पूजा बिरारी. आता समोर आलेल्या एका नव्या व्हिडीओमुळे बांदेकरांच्या घरी सुनेची पहिली झलक पहायला मिळाली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर याच्याच गप्पा रंगल्या आहेत.
आदेश बांदेकरांच्या सूनबाई
आदेश बांदेकरांच्या सूनबाई
advertisement

गेल्या काही दिवसांपासून सोहमच्या लग्नाच्या चर्चांना जोर चढला आहे. या चर्चेचं कारण म्हणजे अभिनेत्री पूजा बिरारी. सोहमसोबत लग्नाची चर्चा असताना ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील मंजिरी या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली पूजा बांदेकर परिवाराच्या कार्यक्रमांमध्ये दिसली. काही दिवसांपूर्वी आदेश बांदेकरांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त झालेल्या आरतीच्या व्हिडीओमध्ये सुचित्रा बांदेकरांच्या शेजारी पूजा उभी असल्याचं दिसलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, चाहत्यांनी “भावी सूनबाई” अशा कमेंट्सचा वर्षाव केला.

advertisement

गौतमी पाटीलचा ग्लॅमरस अवतार, स्विमिंग पूलमध्ये ‘टीप टीप बरसा पाणी’ वर केला डान्स; VIDEO

आदेश बांदेकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, पूजा दिसल्यावर चाहत्यांनी कमेंट करत म्हटलं, 'गणपती बरोबर तुमच्या भावी सूनबाईंचं पण दर्शन झालं. सासू सूनसोबत एकदम मस्त दिसते दृष्ट काढा, भावी सूनबाई पण आहेत आरतीला..खूप छान, गणपती बाप्पा मोरया. सूनबाई हसताये गालातल्या गालात.'

advertisement

खास गोष्ट म्हणजे, या व्हिडीओमुळेच सोहम आणि पूजाच्या नात्याविषयी अधिकृत घोषणा नसतानाही नेटकऱ्यांनी लग्नाच्या चर्चांना दुजोरा दिला. याआधी सुचित्रा बांदेकर यांनी दिलेल्या मुलाखतीत “घरात लवकरच लग्नाची चाहूल लागली आहे” अशी हिंट दिल्यानेच या गॉसिपला पुष्टी मिळाली होती.

aadesh bandekar

advertisement

दरम्यान, पूजाच्या करिअरकडे पाहिल्यास, तिने ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. तिच्या साध्या-सरळ पण प्रभावी अभिनयाने ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. त्यानंतर ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मंजिरीच्या भूमिकेमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली. दुसरीकडे, सोहमने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रात उतरून आपली ओळख वेगळी निर्माण केली आहे. त्याने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातही एक लहान पण लक्षवेधी भूमिका केली आहे.

advertisement

आता सर्वांच्या नजरा सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेकडे लागल्या आहेत. दोघांचेही चाहते याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Aadesh Bandekar: 'सूनबाई गालातल्या गालात हसतायेत...' ; आदेश बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती..! VIDEO मध्ये दिसली भावी सूनेची झलक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल