'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीचा नवा प्रवास दाखवण्यात आला आहे. मालिकेत अरुंधतीचा दुसरा नवरा आशुतोषचा मृत्यू होतो. अरुंधती पुन्हा तिच्या पहिल्या सासरी राहायला येते. मालिकेत सध्या सातत्यानं दुखवट्याचे सीन्स दाखवण्यात येत आहेत. आशुतोषबरोबर लग्न झाल्यानंतर नव्या आत्मविश्वासानं प्रेक्षकांसमोर आलेली अरुंधती पुन्हा एकदा कोलमडून गेल्याचं पाहायला मिळतंय. मालिकेच्या बदलेल्या कथानकाचा पहिला प्रोमो पाहूनच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे याचा मालिकेला फटका बसेल हे सहाजिक होतं.
advertisement
( हेही वाचा - मैत्रीपलिकडे निवेदिता आणि प्रिया बेर्डे यांच्यात आहे मामी-भाचीचं नातं, कसं काय? )
मालिकेची कथा बदलण्याच्या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका संध्याकाळी 7.30 वा प्राइम टाइमच्या वेळेत टेलिकास्टा व्हायची. पण आता मालिकेची वेळ बदलली असून मालिका आता प्रवाह दुपारच्या सेग्मेंटला म्हणजेच दुपारी 2 वाजता टेलिकास्ट होते. मालिकेची वेळ बदलल्यामुळे देखील मालिकेचा TRP कमी होऊ शकतो.
या आठवड्याचा TRPचा आकडा पाहिल्यास, 7.1 TRP रेटिंगसह 'ठरलं तर मग' मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. 6.8 TRP रेटिंगसह 'प्रेमाची गोष्ट' दुसऱ्या क्रमांकावर, 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024' हा 6.8 TRP रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर 6.5 TRP रेटिंगसह 'लक्ष्मीच्या पावलांनी' चौथ्या आणि 6.4 TRP रेटिंगसह 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे.
मागील 4 वर्ष 'आई कुठे काय करते' ही मालिका सातत्यानं पहिल्या तिन्हात किंवा पहिल्या पाचात होती. मात्र या आठवड्याच्या TRPमध्ये मालिका थेट 16व्या क्रमांकावर गेली आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका 3.4 TRP रेटिंगसह 16व्या क्रमांकावर आहे.