aai kuthe kay karte : 'आई कुठे काय करते' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? 'या' दिवशी लास्ट एपिसोड
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'आई कुठे काय करते' ही मालिका 2019 पासून स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू आहे. आतापर्यंत मालिकेनं एक हजाराहून अधिक एपिसोड पूर्ण केले आहे.
मुंबई : 'आई कुठे काय करते' या प्रसिद्ध मालिकेविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 2019पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'आई कुठे काय करते' मालिका संपणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा नेमक्या का आणि कशा सुरू झाल्यात पाहूयात.
'आई कुठे काय करते' ही मालिका 2019 पासून स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू आहे. आतापर्यंत मालिकेनं एक हजाराहून अधिक एपिसोड पूर्ण केले आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. अरुंधती या पात्राभोवती फिरणारी मालिका महाराष्ट्राच्या घरातील प्रत्येक गृहिणीची व्यस्था मांडणारी आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनं अरुंधतीची भूमिका साकारली आहे. मधुराणीनं साकारलेली अरुंधती अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. अरुंधती आणि मधुराणी या दोघांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण तब्बल 5 वर्षांनी मालिका संपणार असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
हेही वाचा - VIDEO : 'डिलिव्हरी बॉय' पाहताना महिलेला अश्रू अनावर; अभिनेत्रीनं मिठी मारत केलं असं काही
अरुंधतीची मालिका सोमवार ते शनिवार रात्री 7.30 वाजता टेलिकास्ट होते. मात्र या स्लॉटला आता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपासून चर्चेत आहे. मालिका किती वाजता टेलिकास्ट होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका 18 मार्चपासून सोमवार ते शनिवारी रात्री 7.30 वाजता टेलिकास्ट होणार आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या वेळेत लागणार आहे. त्यामुळे 'आई कुठे काय कर'ते ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
advertisement
'आई कुठे काय करते' या मालिकेनं मागील 5 वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत कायम पहिल्या पाचात नंबर मिळवला आहे. संध्याकाळी 7.30चा वेळ हा प्राइम टाइमचा असल्यानं पहिल्या दिवसापासून मालिकेला त्याचा फायदा झाला. पण 18 मार्चपासून 7.30 वाजता घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सुरू होणार आहे. नव्या मालिकेमुळे 'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 18 मार्चला सुरू होतेय. 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला तर 16 मार्चला मालिकेचा लास्ट एपिसोड असेल असा अंदाज आहे.
Location :
First Published :
February 12, 2024 11:39 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
aai kuthe kay karte : 'आई कुठे काय करते' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? 'या' दिवशी लास्ट एपिसोड