TRENDING:

बिग बॉस फेम अभिनेत्याला अटक, रस्त्यावर धिंगाणा, दारूच्या नशेत गाड्यांचा चुराडा

Last Updated:

बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्यानं मोठा कांड केला आहे. अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. नेमकं झालंय काय?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनोरंज विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्याला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना पोलिसांनी पकडलं असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नेमकं काय घडलं पाहूयात.
News18
News18
advertisement

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये ही घटना घडली. कन्नड चित्रपट उद्योगातील (चंदन) प्रसिद्ध अभिनेता मयूर पटेलविरुद्ध पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे आणि बेपर्वा गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ओल्ड एअरपोर्ट रोडवर झालेल्या एका भीषण अपघातानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

( Bigg Boss फेम अभिनेत्याचा डिवोर्स? 9 वर्षांचा संसार मोडणार! बायकोच्या पोस्टने खळबळ )

advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, ओल्ड एअरपोर्ट रोडवर मयूर पटेल त्याची फॉर्च्युनर कार अत्यंत वेगाने चालवत होता. नियंत्रण सुटलं आणि त्याची कार पार्क केलेल्या कारला धडकली. धडक इतकी जोरदार होती की मागच्या इतर गाड्यांनाही धक्का बसला. जवळील इतर वाहने एकमेकांवर आदळली. अपघातात एकूण चार वाहनांचे मोठे नुकसान झालं. सुदैवाने या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही परंतु सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.

advertisement

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अभिनेता मयूर पटेलला ताब्यात घेतले. ब्रेथअ‍ॅलायझर चाचणी घेण्यात आली जी पॉझिटिव्ह आली. अभिनेता दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अभिनेत्याची आलिशान फॉर्च्युनर कार जप्त केली. तसंच  त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा दर तेजीत, आले आणि डाळिंबाला कसा मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

अभिनेता मयूर पटेलबद्दल सांगायचं झाल्यास तो एका प्रतिष्ठित चित्रपट कुटुंबातील आहे. तो दिग्गज अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक मदन पटेल यांचा मुलगा आहे. मयूरने 2000मध्ये कन्नड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.  'गुन्ना' आणि 'स्लम' सारख्या चित्रपटांमधून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली. तो "बिग बॉस कन्नड" मध्येही दिसला होता.   या रिअॅलिटी शोने तो घराघरात पोहोचला.

मराठी बातम्या/मनोरंजन/
बिग बॉस फेम अभिनेत्याला अटक, रस्त्यावर धिंगाणा, दारूच्या नशेत गाड्यांचा चुराडा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल