TRENDING:

Sharad Ponkshe : 'राहुल गांधीचं आडनाव खान आहे'; शरद पोंक्षेंची थेट गांधी घराण्यावर टीका

Last Updated:

स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव निमित्त मालेगावला भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन आणि जनजागृती साठी सावरकरांच्या जीवनावर अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बब्बू शेख: प्रतिनिधी
शरद पोंक्षे
शरद पोंक्षे
advertisement

मुंबई, 17 ऑगस्ट :  राहुल गांधी यांचे खरे आडनाव 'खान' असून त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन गांधी नाव मिळविले असें वादग्रस्त वक्तव्य अभिनेते शरद पोक्षे यांनी केलं आहे.  मालेगाव येथीस एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव निमित्त मालेगावला भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन आणि जनजागृती साठी सावरकरांच्या जीवनावर अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंचावर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर टिका केली.

advertisement

यावेळी बोलताना शरद पोंक्षे यांनी  राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत हे खरच गांधी आहे का असा सवाल केला आहे. राहुल गांधी यांचे मुळ नाव खान असल्याची टिका करत राफेल प्रकरणात सुध्दा सुप्रिम कोर्टात माफी मागितली. जो पर्यंत अपिल करण्याची संधी आहे तो पर्यंत कोर्टात हे माफी मागीत असता. सावरकर प्रकरणात हेच झाले एकतर तु गांधी नाही आणि सावरकर पण नाही हे काही ओरिजनल गांधी नाही तर खान आहे. हे काही महात्मा गांधीचे वंशज नाही त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला. ही फिरोज खान यांची पुढची पिळावळ आहे. हा इतिहास आहे. मुर्खाला आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही तर सावरकरांचा कसा माहित असणार अशी टिका शरद पोंक्षे यांनी त्यांच्या व्याख्यानात केली.

advertisement

हेही वाचा - ना 'आदिपुरूष', ना 'केरळ स्टोरी' ; 2023 मध्ये 'हा' एक चित्रपट ठरला लयभारी

अभिनेते शरद पोंक्षे नेहमीच आपली स्पष्ट भुमिका मांडत असतात. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे सातत्यानं चर्चेत येत असतात.  शरद पोंक्षे मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकातून रंगभूमी गाजवली होती. त्यांचं हे अजरामर नाटकं पुन्हा एकदा सुरू होणार आहे. नुकतीच त्यांची याची घोषणा केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गजाआडही खुलली कला! कैद्यांनी कारागृहात बसून काढली चित्रं, इथं भरलंय प्रदर्शन
सर्व पहा

2018मध्ये शरद पोंक्षे यांनी काही कारणास्तव मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक बंद करण्याची घोषणा केली होती. 'मी यापुढे रंगभूमीवर नथुरामच्या भूमिकेत कधीही दिसणार नाही' असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर आता तब्बल 4 वर्षांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येणार आहे. आता नथुराम गोडसेंची भुमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Sharad Ponkshe : 'राहुल गांधीचं आडनाव खान आहे'; शरद पोंक्षेंची थेट गांधी घराण्यावर टीका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल