TRENDING:

Mumbai Maratha Andolan: अभिनेत्रीची मराठा आंदोलकांबद्दल दुपारी खळबळजनक पोस्ट, रात्री डिलीट, चर्चांना उधाण

Last Updated:

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये भूरीचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने मुंबईमध्ये मराठा आंदोलकांनी आपली गाडी अडवल्याची पोस्ट शेअर केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये मनोज जरांगे यांचं एकीकडे उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलकांकडून ठिकठिकाणी हुल्लडबाजी केल्याचे प्रकार समोर आले आहे. अशातच कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये भूरीचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने मुंबईमध्ये मराठा आंदोलकांनी आपली गाडी अडवल्याची पोस्ट शेअर केली होती. पण, तिच्या पोस्टमध्ये सर्वत्र खळबळ उडाली होती. अखेरीस तिने ही पोस्ट डिलीट केली आहे.
News18
News18
advertisement

मुंबईतील आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मागील ४ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मुंबईत लाखो मराठा बांधव मुक्कामी आहे. पण, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे स्थानक, दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी मराठा बांधव मिळेल त्या ठिकाणी ठाण मांडून आहे. अशातच दक्षिण मुंबईतून आपल्या कारमधून प्रवास करत असताना अभिनेत्री सुमोन चक्रवर्तीने मराठा आंदोलकांबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिच्या कारसमोर काही तरुण जे गळ्या भगव्या रंगाची शाल पांघरलेल्या माणसांनी येईल धिंगाणा घातला होता. दुपारी तिनेही पोस्ट केली होती. पण, रात्री उशिरा तिनेही पोस्ट डिलीट केली. याबद्दल तिने कोणताही खुलासा केली नाही. सुमोनाने पोस्ट डिलीट केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

advertisement

काय केली होती सुमोनाने पोस्ट?

सुमोना चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलं की, 'आज दुपारी 12:30 वाजता मी कुलाबा ते फोर्ट जात असताना अचानक माझ्या गाडीचा रस्ता एका जमावाने अडवला. एका भगव्या शाल पांघरलेल्या माणसाने माझ्या गाडीच्या बोनेटवर हात आपटला. त्याचे मित्र माझ्या गाडीच्या खिडक्यांवर हात आपटत 'जय महाराष्ट्र!'च्या घोषणा देत हसत होते. पाच मिनिटांत दोनदा हीच घटना घडली. तिथे कोणताही पोलीस नव्हता (नंतर दिसलेले पोलीस फक्त बसून गप्पा मारत होते).

advertisement

ती पुढे म्हणाली, मी जवळपास आयुष्यभर मुंबईत राहिले आहे आणि विशेषतः दक्षिण मुंबईत मला कधीच असुरक्षित वाटलं नव्हतं. पण आज अनेक वर्षांत पहिल्यांदाच भर दिवसा माझ्या स्वतःच्या गाडीत असताना मला खरंच असुरक्षित आणि असुरक्षित वाटलं. माझ्यासोबत एक पुरुष मित्र होता, याचं मला समाधान वाटलं. जर मी एकटी असती तर काय झालं असतं, हा विचार माझ्या मनात आला. मी व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा विचार केला;पण त्यामुळे ते आणखी चिथावले जातील, असं वाटल्याने मी ते केलं नाही. तुम्ही कोणीही असा किंवा कुठेही असा कायदा आणि सुव्यवस्था कोणत्याही क्षणी कोलमडू शकते, हे समजल्यावर खूप भीती वाटतं. एवढंच नाहीतर  सुमोना चक्रवर्तीने या घटनेला 'संपूर्ण बेकायदेशीरपणा' (Absolute lawlessness) म्हटलं होतं.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Mumbai Maratha Andolan: अभिनेत्रीची मराठा आंदोलकांबद्दल दुपारी खळबळजनक पोस्ट, रात्री डिलीट, चर्चांना उधाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल