TRENDING:

धर्मेंद्र यांच्यानंतर बॉलिवूडचा आणखी एक दिग्गज अभिनेता रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

Last Updated:

धर्मेंद्र यांना ब्रीच कँडीमध्ये व्हेंटिलेटरमध्ये दाखल केल्याची बातमी आल्यानंतर लगेच बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: बॉलिवूडचे लाडके खलनायक आणि ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना आज सोमवार, १० नोव्हेंबर २०२५ रोजी अचानक प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९० वर्षीय या दिग्गज अभिनेत्याला फुफ्फुसांचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, धर्मेंद्र यांना ब्रीच कँडीमध्ये व्हेंटिलेटरमध्ये दाखल केल्याची बातमी आल्यानंतर लगेच प्रेम चोप्रा यांच्या रुग्णालयात दाखल होण्याची बातमी समोर आली आहे.
News18
News18
advertisement

फुफ्फुसाच्या संसर्गामुळे वाढली चिंता

प्रेम चोप्रा यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात डॉ. नितीन गोखले आणि डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सुरुवातीला त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होती, पण आता त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग पसरला आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर त्यांना पुढील दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल.

advertisement

Dharmendra : 'तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा...' धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत हेमा मालिनी यांनी थेट हॉस्पिटलमधून दिली पहिली प्रतिक्रिया

प्रेम चोप्रा यांनी बॉलिवूडला दिला 'तो' अजरामर डायलॉग

प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा खास अभिनय आणि संवादफेक आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. 'बॉबी' चित्रपटातील त्यांचा प्रसिद्ध संवाद "प्रेम नाम है मेरा... प्रेम चोप्रा" आजही लोकप्रिय आहे. भारतीय सिनेमाला दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल त्यांना २०२३ मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

advertisement

कोरोनाशी झुंज आणि निधनाची अफवा 

काही वर्षांपूर्वी प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नी उमा चोप्रा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी दोघांवरही लीलावती रुग्णालयात डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली यशस्वी उपचार झाले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रेम चोप्रा यांच्या निधनाची चुकीची अफवा यापूर्वी सोशल मीडियावर पसरली होती, ज्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. "अशा अफवांमुळे कुटुंब आणि मित्र उगाच चिंतेत पडतात," असे ते म्हणाले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरून सुचली कल्पना, बनवला भन्नाट मोबाईल बेल्ट, 7 लाख रुपयांची कमाई
सर्व पहा

दरम्यान, धर्मेंद्र यांच्यानंतर आता प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीची बातमी समोर आल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे. चाहते सोशल मीडियावर दोघेही लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
धर्मेंद्र यांच्यानंतर बॉलिवूडचा आणखी एक दिग्गज अभिनेता रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल