म्हैसूर सँडल साबण कंपनीने ब्रॅड अॅम्बेसेडर तमन्ना भाटियाला तब्बल 6 कोटी कराराची किंमत दिली. सरकारच्या या निर्णयावर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कर्नाटकातील स्थानिक संघटना, विशेषतः 'कर्नाटक रक्षण वेदिके' यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
आजोबा राजा, पणजोबा PM, अभिनेत्रीने लपवलं पहिलं लग्न, नंतर घटस्फोटीत अभिनेत्याशी थाटला दुसरा संसार
advertisement
“म्हैसूरच्या वारशाला, कन्नड अस्मितेला तमन्ना काय समजेल? तिच्या ऐवजी दीपिका पदुकोण, रश्मिका मंदाना, हर्षिका पुनच्ळ, श्रद्धा श्रीनाथ यांसारख्या स्थानिक अभिनेत्रींना संधी का नाही दिली?" असा संतप्त सवाल संघटनांच्या नेत्यांनी उपस्थित केला. टी. नारायणगौडा, कर्नाटक रक्षण वेदिकेचे अध्यक्ष, यांनी तमन्नाच्या निवडीवर थेट ‘कर्नाटकचा अपमान’ असा शिक्का मारला असून सरकारला निर्णय रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
सरकारने मात्र आपली बाजू स्पष्ट करत हा निर्णय केवळ सौंदर्य वा लोकप्रियतेवर नव्हे, तर मार्केटिंग डायल्यूजनवर आधारित आहे, असं ठामपणे सांगितलं आहे. उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी म्हटलं, "म्हैसूर सॅंडल केवळ कर्नाटकापुरता ब्रँड नाही. तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठा गाठण्याचा उद्देश आहे. तमन्नासारखी पॅन-इंडिया ओळख असलेली अभिनेत्री त्यासाठी पाहिजे आहे."
दरम्यानस तमन्ना भाटियाने या वादावर अजून कोणताही सार्वजनिक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता सुरु असलेल्या वादावर तमन्ना काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.