आशिष वारंग यांनी जरी छोट्या भूमिका साकारल्या, तरी त्या नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. ‘दृश्यम’ चित्रपटात त्यांनी पोलिस इन्स्पेक्टरची दमदार भूमिका साकारली होती. तर राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’मध्ये मोरे या पात्रातून त्यांची वेगळी छाप उमटली. रोहित शेट्टीच्या ब्लॉकबस्टर ‘सूर्यवंशी’मध्ये त्यांनी अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यांच्या या भूमिकांनी त्यांना बॉलिवूडमध्येही विशेष ओळख मिळवून दिली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात त्यांना कावीळ झाली होती, पण ते त्यातून बरे झाले होते. मात्र, यावेळी अचानक आलेल्या आजारामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जाण्याने चाहते आणि सहकारी कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत मोठी शोककळा पसली आहे.
आशिष वारंग यांचं आयुष्य साधं पण अभिनय समृद्ध होता. त्यांनी ज्या काही भूमिका केल्या, त्यात नेहमीच प्रामाणिकपणे कामगिरी बजावली. आज ते नसले, तरी त्यांच्या आठवणी त्यांच्या कामातून कायम राहतील, अशी भावना चित्रपटसृष्टी व्यक्त करत आहे.