दरवर्षी बच्चन कुटुंबीय आराध्या शाळेच्या फंक्शनला एकत्र दिसतात. यंदाही ऐश्वर्या अभिषेक आराध्याच्या शाळेत पोहोचले. लेकीच्या शाळेच्या प्रोग्रामसाठी ऐश्वर्या राय तिच्या खास अंदाजात पोहोचली. ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत अमिताभ बच्चन यांनीही नातीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. अभिषेक बच्चन, ऐश्वर्या आणि अभिषेक अनेक दिवसांनी एकत्र दिसले.
( Amitabh Bachchan : आते हैं! अमिताभ बच्चन यांचे धडाधड 3 ट्वीट, चाहत्यांची चिंता वाढली )
advertisement
अनेक दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या डिवोर्सच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आराधाच्या शाळेच्या कार्यक्रमासाठी येताना ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी एकमेकांना हात धरलेला दिसला. डिवोर्सच्या चर्चांना धुळ चारत दोघांनी ऐटीत एन्ट्री घेतली. अभिषेक ऐश्वर्या यांच्यात सगळं काही आलेबल असल्याचं पाहायला मिळालं.
अमिताभ बच्चनसोबत असताना ऐश्वर्या पुन्हा एकदा सुनेचं कर्तव्य निभावताना दिसली. तिनं अमिताभ बच्चन यांना अभिषेकसोबत व्यवस्थित कारमध्ये बसवलं, ते निघनाता तिने त्यांना प्रेमानं बाय देखील केलं. ऐश्वर्याची ही मुमेन्ट कॅमेरात कैद झाली असून सासरे आणि सुनेच्या बॉन्डिंगचं कौतुक होत आहे.
तर दुसरीकडे आराध्या बार्बी डॉलसारखी दिसत होती. शाळेतून बाहेर येतानाचा आराध्याचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तिची खास झलक पाहायला मिळतेय.आराध्या एन्युअल डेला पिंक फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसली. मिनिमल मेकअप आणि ओपन हेअरमध्ये आराध्याचा नेहमीपेक्षा वेगळा लूक दिसत होता. पिंक ड्रेससोबत आराध्यानं पिंक हेअर बँडही लावला होता. या लूकमध्ये आराध्या बार्बीपेक्षा कमी दिसत नव्हती. आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
बच्चन कुटुंबाविषयी मधल्या काही काळात अनेक उलट सुटल चर्चा सुरू होत्या. त्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. दरम्यान आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमानिमित्त बच्चन कुटुंबीयांना एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
