साड्यांच्या व्यवसायात एंट्री!
या तीन लोकप्रिय अभिनेत्रींनी आता एकत्र येऊन एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी 'थ्रेड अँड ठुमका By Tasvi' नावाचा एक क्लोथिंग ब्रँड लॉन्च केला आहे. या ब्रँडमध्ये त्या खास साड्या घेऊन येत आहेत. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी सगळ्यांना दिली.
व्हिडिओमध्ये या तिघीही खूप उत्साहाने बोलताना दिसत आहेत. त्या म्हणाल्या, “आजवर तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलं आहे आणि आमच्यावर खूप प्रेम केलं आहे. त्यामुळेच तुमच्यासोबत एक आनंदाची बातमी शेअर करत आहोत. आम्ही ‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’ नावाचा आमचा ब्रँड लॉन्च करत आहोत.”
advertisement
कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
मालिकेत एकत्र काम केल्यानंतर खऱ्या आयुष्यातही मैत्री जपून व्यवसाय सुरू केल्यामुळे सगळ्यांकडून या तिघींचं खूप कौतुक होत आहे. त्यांच्या या नव्या प्रवासासाठी त्यांचे मित्रमंडळी, चाहते आणि मराठी कलाकार त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत.
अभिनेत्री अनघा अतुल, शर्मिला शिंदे आणि एकता डांगर यांनी कमेंट करून आणि इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करून त्यांना प्रोत्साहन दिलं आहे. या तिघी केवळ अभिनयच नाही, तर आता बिझनेसच्या जगातही आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.