'पुष्पा 2' च्या शेवटी सिक्वेलचे संकेत मिळाल्यानंतर, चाहते गेल्या काही महिन्यांपासून 'पुष्पा 3' बद्दल अंदाज लावत आहेत. पण आतापर्यंत कोणतीही बातमी नव्हती. अलिकडेच एका कार्यक्रमात निर्माते रविशंकर यांनी सांगितले की, पुढील भागाचे चित्रीकरण लवकरच सुरू होईल. 'पुष्पा 3' नक्कीच बनवला जाईल, पण चाहत्यांना त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल, अशी पुष्टी त्यांनी केली.
advertisement
बॉक्स ऑफिसवर DISASTER, 300 कोटींचा सिनेमा आता OTT वर टॉप ट्रेंडिंग!
सध्या अल्लू अर्जुन दोन मोठ्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे, एक अॅटली दिग्दर्शित आहे आणि दुसरा त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित आहे. हे दोन्ही चित्रपट पूर्ण होण्यासाठी अंदाजे 2 वर्षे लागतील. यानंतर 'पुष्पा 3' चे शूटिंग सुरू होईल. दिग्दर्शक सुकुमार देखील त्यांच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहेत, जो तो राम चरणसोबत बनवत आहे. हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील. मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक दोघेही व्यस्त असल्याने, 'पुष्पा 3' चे चित्रीकरण सुमारे अडीच वर्षांनी सुरू होण्याची शक्यता आहे.
रविशंकर म्हणाले की, यावेळी त्यांची टीम वेगाने काम करत आहे आणि 2028 मध्ये 'पुष्पा 3' प्रदर्शित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. निर्मात्याने सांगितले, 'आम्ही पूर्वीसारखे काम पुढे ढकलणार नाही, उलट आम्हाला आशा आहे की आम्ही तीन वर्षांत लवकर परत येऊ आणि चित्रपट 2028 मध्ये प्रदर्शित होईल.'