अमिताभ बच्चन यांनी खरेदी केली 3 प्लॉट
सीआरई मॅट्रिक्सकडून मिळालेल्या रेकॉर्डनुसार, नव्याने घेतलेले प्लॉट क्रमांक 96, 97 आणि 98 असून एकूण 9,557 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले आहेत. 7 ऑक्टोबर 2025 रोजी बिग बी यांनी ही प्रॉपर्टी खरेदी केली होती. अमिताभ बच्चन यांनी त्यावेळी 39.58 लाख रुपये भरत जागा आपल्या नावे केली होती. प्लॉट 96 हा सर्वात मोठा असून 4,047 चौरस फूट आहे आणि त्याची किंमत 2.78 कोटी रुपये आहे. प्लॉट 97 हा 2,776 चौरस फूट असून याची किंमत 1.92 कोटी रुपये आहे. प्लॉट 98 हा 2,734 चौरस फूट असून त्याची किंमत 1,88 कोटी रुपये आहे. ही सर्व प्रॉपर्टी HOABL लँडबिल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून खरेदी करण्यात आली आहे.
advertisement
Amitabh Bachchan Real Surname : अमिताभ 'बच्चन' नाहीये, बिग बींचं खरं आडनाव माहितीये का?
अलिबागमध्ये दुसरी प्रॉपर्टी!
अमिताभ बच्चन यांची अलिबागमधील दुसरी प्रॉपर्टी आहे. एप्रिल 2024 मध्ये त्यांनी याच भागात 10 कोटी रुपये देऊन 10,000 चौरस फूटचा एक प्लॉट होबल कंपनीकडून खरेदी केला होता. अलिबाग व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांनी अयोध्यामध्येही गुंतवणूक केली आहे. राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाच्या आधी त्यांनी अयोध्येत 5,372 चौरस फूटचा एक फ्लॉट खरेदी केला होता. अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील जुहू परिसरात जलसा, प्रतीक्षा, जनक आणि वत्सा अशे चार बंगले आहेत. यातील जलसा या बंगल्यात ते राहतात.
अभिताभ बच्चन गेल्या 6 दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शहंशाह,जंजीर,डॉन, शोले, मोहब्बते आणि पीकू सारख्या चित्रपटांत जबरदस्त काम केलं. आता अमिताभ बच्चन 2026 गाजवण्यासाठी सज्ज आहेत. कल्कि 2898 पार्ट 2, ब्रह्मास्त्र पार्ट 2, आंखें 2 हे बिग बींचे आगामी प्रोजेक्ट आहेत. या चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.