शूटिंगच्या वेळी शॉपिंगला जायची...
अमिताभ आणि रेखा एका चित्रपटाचं शूटिंग करत होते. मुलाखतीचं आयोजन असल्याने या चित्रपटाचं शूटिंग सकाळी 9 वाजता सुरू होणार होतं. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन 7 वाजता सेटवर पोहोचले होते. मेकअप आणि गेटअप करुन अमिताभ बच्चन 9 वाजेपर्यंत तयार झालेला असे. पण चित्रीकरणाची वेळ आली तरी रेखा सेटवर उपस्थित नसत. रेखा शूटिंगच्यावेळी कोलकाता येथे शॉपिंग करायला जात असे. शॉपिंगला गेलेल्या असल्याने रेखा तासनतास सेटवरुन गायब असे. शॉपिंगवरुन आल्यानंतर रेखा यांना आपले संवादही आठवत नसे.
advertisement
Rakhi Sawant : डोनाल्ड ट्रम्प माझे पप्पा, बुर्ज खलिफात 4-5 फ्लॅट; दुबई रिर्टन राखी सावंत काय काय बरळली?
अमिताभ बच्चन आपल्या भूमिकेत पूर्णपणे तयार असे. सर्व संवाद त्यांचे पाठ असे. फक्त एक-दोन दिवस नव्हे तर अनेक दिवस अमिताभ यांना शॉपिंगच्या कारणाने रेखा यांनी त्रास दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक, निर्मात्यांकडे रेखा यांची तक्रारदेखील केली होती. अमिताभ यांना रेखा या अनप्रोफेशनल वाटत होत्या. दुसरीकडे निर्मात्यांनीही रेखा यांना पाठिंबा दिला. रेखा यांची आता ही सवय झाली असल्याचं उत्तर त्यांनी दिलं. त्यामुळे इंडस्ट्रीत वेळेची किंमत नाही आणि प्रोफेशनलिज्म कधीच येऊ शकत नाही याचा अंदाज अमिताभ बच्चन यांना आला.
अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट
अमिताभ बच्चन लवकरच 'सेक्शन 84','आँखे 2','द इन्टर्न' आणि 'ब्रह्मास्त्र -2' या चित्रपटात झळकणार आहेत. वयाच्या 80 व्या वर्षानंतरही अमिताभ बच्चन तेवढेच सक्रीय आहेत. आजही दिवसातले 12-12 तास ते चित्रीकरण करतात. सध्या 'कौन बनेगा करोडपती' या बहुचर्चित कार्यक्रमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.