नेहमीच प्रसिद्धीपासून लांब राहणाऱ्या अरिजीतने अचानक असा निर्णय का घेतला? त्याने निवृत्तीपूर्वी गायलेलं शेवटचं गाणं कोणतं? याबद्दल आता त्याचे फॅन्स जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. चला याबद्दल थोडी माहिती घेऊ.
"मी आता थांबतोय..." अरिजीतची भावनिक पोस्ट
अरिजीत सिंगने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक नोट शेअर करत ही माहिती दिली. त्याने लिहिले की, "मी यापुढे प्लेबॅक व्होकलिस्ट म्हणून कोणतीही नवीन कामं घेणार नाहीये. हा एक सुंदर प्रवास होता आणि मी आता इथेच थांबत आहे (I am calling it off)." अरिजीतने स्पष्ट केलं की, तो संगीत निर्मिती थांबवणार नाही, पण चित्रपटांसाठी गाणी गाणं (Playback Singing) तो आता बंद करणार आहे. त्याला स्वतःच्या संगीतावर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे, भारतीय शास्त्रीय संगीताकडे पुन्हा वळण्याची त्याची इच्छा आहे.
advertisement
रिटायरमेंट आधीचं शेवटचं गाणं कोणतं?
निवृत्तीच्या घोषणेपूर्वी अरिजीतने सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'बॅटल ऑफ गालवान' (Battle of Galwan) या चित्रपटासाठी 'मातृभूमी' (Maatrubhumi) हे गाणं गायलं आहे, हा सिनेमा अजून रिलिज झाला नाही. हे गाणं त्याच्या कारकिर्दीतील प्लेबॅक सिंगर म्हणून शेवटचं अधिकृत गाणं मानलं जात आहे. तसेच आत्ताच रिलिज झालेल्या 'बॉर्डर 2' या सिनेमासाठी देखील अरिजीतने "घर कब आओगे" (Ghar Kab Aaoge) हे गाणं गायलं आहे. याशिवाय विशाल भारद्वाज यांच्या 'ओ रोमियो' या चित्रपटासाठीही त्याने 'हम तो तेरे ही लिये थे' हे गाणं रेकॉर्ड केलं आहे. काही जुने कमिटमेंट्स अजून बाकी असल्यामुळे या वर्षात त्याची आणखी काही गाणी रिलीज होण्याची शक्यता आहे.
अरिजीत सिंगची अलीकडील गाजलेली गाणी (Recent Hits):
१. सजनी (Sajni) - 'लापता लेडीज' चित्रपटातील या गाण्याने 2024 मध्ये धुमाकूळ घातला.
२. ओ माही (O Maahi) - 'डंकी' चित्रपटातील हे गाणं आजही लोकांच्या ओठावर आहे.
३. सतरंगा (Satranga) - 'ॲनिमल' चित्रपटातील विरहाचे हे गाणे प्रचंड गाजले.
४. अपना बना ले (Apna Bana Le) - 'भेडिया' चित्रपटातील या गाण्याने तरुणाईला वेड लावलं आहे.
कारकिर्द घडवणारी 'Evergreen' गाणी:
अरिजीतच्या आवाजाशिवाय बॉलिवूड अपूर्ण वाटतं. त्याच्या प्रवासातील काही मैलाचे दगड ठरलेली गाणी:
तुम ही हो (आशिकी 2): या गाण्याने त्याला रातोरात सुपरस्टार बनवलं.
चन्ना मेरेया (ए दिल है मुश्किल): ब्रेकअप 'अँथम' म्हणून हे गाणं ओळखलं जातं.
अगर तुम साथ हो (तमाशा): आजही डिप्रेशन किंवा दुःखात हे गाणं अनेकांना सावरतं.
केसरिया (ब्रह्मास्त्र): अलिकडच्या काळातील सर्वात मोठं रोमँटिक गाणं.
फिर मोहब्बत (मर्डर 2): हे त्याचं बॉलिवूडमधील पहिलं गाणं होतं.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया:
अरिजीतच्या या निर्णयावर चाहते खूपच भावूक झाले आहेत. एका चाहत्याने लिहिलंय, "बॉलिवूडचा आत्मा अरिजीत होता, आता संगीत ऐकण्यात ती मजा उरणार नाही." तर काहींनी याला "विराट कोहलीच्या निवृत्तीसारखा धक्का" म्हटलं आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्याने हा निर्णय घेतल्यामुळे संगीतसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
