TRENDING:

वयाच्या पस्तिशीत बांधली लग्नगाठ; गर्भपातानंतर अखेर 41 व्या आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री

Last Updated:

आता एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीनं गुडन्यूज दिली आहे. वयाच्या 41 व्या वर्षी ही अभिनेत्री आई झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा ट्रेंड सुरु आहे. अनेकजण आपल्या साथीदारासोबत नवी सुरुवात करतायत. अशातच आता एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीनं गुडन्यूज दिली आहे. वयाच्या 41 व्या वर्षी ही अभिनेत्री आई झाली आहे. ‘राजा भैय्या’, ‘आवारा पागल दिवाना’, ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘मिलेंगे मिलेंगे’ या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री आरती छाब्रियाने वयाच्या 41 व्या वर्षी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिने चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
 वयाच्या 41 व्या आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री
वयाच्या 41 व्या आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री
advertisement

अभिनेत्री आरती छाब्रिया आई झाली आहे. अभिनेत्रीनं 4 मार्च रोजी आपल्या मुलाला जन्म दिला . अभिनेत्रीनं त्याच्या नावाचाही खुलासा केला आहे. आरतीनं आपल्या मुलाचं नाव 'युवान' असं ठेवलं आहे. मुलगा युवानच्या जन्मानंतर एका महिन्यानंतर अभिनेत्रीनं ही गुडन्यूज शेअर केली आहे. नुकतंच तिने मातृत्वाच्या प्रवासाबद्दलचा अनुभव शेअर केला आणि तिने ही बातमी आत्तापर्यंत चाहत्यांपासून का लपवली होती याचा देखील खुलासा केला आहे. वयाच्या 41 व्या वर्षी आई झालेल्या आरती छाब्रियाने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी संपूर्ण 9 महिने चाहत्यांपासून लपवून ठेवली होती.

advertisement

Disney च्या सिनेमात राणी होणार आलिया भट्ट? आगामी प्रोजेक्टविषयी मोठी माहिती समोर

हिंदुस्तान टाइम्सशी तिच्या मातृत्वाच्या प्रवासाविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा तुम्ही 41 वर्षांचे असता तेव्हा आई होणं वयाच्या विशी किंवा तिशी इतकं सोपं नसतं. माझ्यासाठी ही खूप अवघड प्रक्रिया होती. भूतकाळात माझा अनेकदा गर्भपात झाला. त्यामुळंच योग्य वेळ आल्यावरच ही बातमी चाहत्यांना देऊ असं मला वाटलं. मला वेळेआधी याविषयी कोणाला काही सांगायचं नव्हतं. शेवटी मी पण माणूसच आहे. या काळात मला अनेक समस्यांचा सामना करावा लागला.'

advertisement

आरती पुढे म्हणाली, 'लोकांना वाटतं की ती अभिनेत्री आहे म्हणून तिच्यासाठी या गोष्टी सोप्या असतील. पैसे देऊन सगळं काम होईल. पण तसं नसतं. गर्भधारणेच्या उपचारांचा माझ्या शरीरावर खूप वाईट परिणाम झाला. माझं शरीर सुस्त झालं होतं. माझं वजनही वाढत होतं. माझ्या शरीरासाठी मला ट्रोलही करण्यात आलं. मी खूप थकले होते.' असा खुलासा अभिनेत्रीनं केला आहे. पण इतक्या कष्ट आणि मेहनत घेऊन आई झाल्यानंतर अभिनेत्री खूपच आनंदी आहे.

advertisement

आरती छाब्रियाने 2019 मध्ये विशारद बिदासीशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ती पतीसोबत ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाली. याविषयी बोलताना ती म्हणाली होती की, 'कोविडच्या काळात आम्ही ऑस्ट्रेलियात अडकलो होतो. ती स्थिती खूप तणावपूर्ण होती. तणावाखाली गर्भधारणा होणं कोणासाठीही अवघड आहे. या काळात मी प्रेग्नन्ट राहिले, पण तणावामुळे माझा गर्भपात झाला. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण गेला होता. पण आता माझ्या मुलाच्या जन्मानंतर माझ्या सगळ्या समस्या नाहीशा झाल्यासारखं वाटतंय. तो काळ आम्हा सर्वांसाठी खूप कठीण होता. पण, हे सर्व सहन केल्यानंतर आज अखेर आनंद आमच्या आयुष्यात आला आहे.' अशा भावना अभिनेत्रीनं व्यक्त केल्या आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
वयाच्या पस्तिशीत बांधली लग्नगाठ; गर्भपातानंतर अखेर 41 व्या आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल