'फायनली'च्या धक्क्यातून चाहते सावरत असतानाच, आणखी एका फोटोने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली. "आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय," असं त्या फोटोखाली लिहिलं होतं. त्यानंतर तर चर्चांना उधाण आलं! कुणी लग्नाची बोलणी सुरू केली, तर कुणी भविष्याची स्वप्न रंगवली. एका क्षणात आशिष आणि एलीची जोडी इंटरनेटवर 'हॉट टॉपिक' बनली. गायक अर्जुन कानूनगोने तर 'मी लग्नासाठी माझी शेरवानी आधीच खरेदी केली होती!' अशी कमेंट करून या चर्चांना आणखी हवा दिली. पण, ज्या वेगाने ही 'प्रेमकहाणी' फुलली, त्याच वेगाने या लव्हस्टोरीचा एन्ड झाला.
advertisement
आज अखेर १९ जुलै २०२५ रोजी, त्या सस्पेन्सवरचा पडदा दूर झाला आणि चाहत्यांना कळलं की, हे सारं एका धमाकेदार म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनसाठी रचलेलं नाटक होतं! आशिष आणि एली यांनी एकत्र 'चंदनिया' नावाचा एक म्युझिक व्हिडिओ आणला आहे आणि त्यांची व्हायरल झालेली प्रेमकहाणी म्हणजे याच व्हिडिओसाठी केलेली एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती!
या प्रँकवर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी 'बेवकूफ बनवणं कुणी यांच्याकडून शिकावं' असं म्हणत कौतुक केलं, तर काहींनी 'ज्यांनी आम्हाला वेडं बनवलं, त्यांनीच आम्हाला वेड्यात काढलं!' अशी मजेदार प्रतिक्रिया दिली.
आशिष चंचलानी हा त्याच्या विनोदी व्हिडिओंसाठी आणि पॅरोडी स्केचेससाठी ओळखला जातो तर, एली अवराम ही 'बिग बॉस ७' मुळे भारतात प्रसिद्ध झालेली एक स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री आहे, जिने 'मिकी व्हायरस', 'गुडबाय' सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
आशिष आणि एलीच्या फोटोमुळे गेल्या आठवड्यात एली अवरामला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिच्या चारित्र्यावर आणि खासगी आयुष्यावर अनेक प्रश्नचिन्हं उभे करण्यात आले. पण, एलीने आणि तिच्या खऱ्या चाहत्यांनी या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं. एकीकडे चाहत्यांचा हिरमोड झाला असला, तरी आशिष आणि एलीच्या 'चंदनिया' म्युझिक व्हिडिओने मात्र सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.