अनेक वर्षांनी अशोक सराफ आणि वंदना गुप्ते एकत्र
या चित्रपटात अनेक वर्षांनी अशोक सराफ आणि वंदना गुप्ते ही जोडी एकत्र दिसणार आहे. याशिवाय ओमकार कुलकर्णी आणि तनिष्का विशे ही नवी जोडी देखील या चित्रपटात झळकणार आहे. यात सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लोकेश गुप्ते यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
advertisement
( बालपण, मैत्री आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या; 'एप्रिल मे 99' चा टीझर रिलीज )
चित्रपती व्ही. शांताराम यांचे नातू आणि किरण व्ही. शांताराम यांचे चिरंजीव राहुल शांताराम यांनी राजकमल एंटरटेनमेंटची स्थापना केली आहे. मनोरंजन विश्वात काहीतरी नवे घेऊन येण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या कंपनीचा हा पहिला चित्रपट आहे.
रिलीज डेट
"अशी ही जमवा जमवी" या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच चित्रपटाची कथा रंजक असल्याचे जाणवते. ही जमवा जमवी नेमकी कशी होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना एप्रिल पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 10 एप्रिल 2025 रोजी हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.