TRENDING:

Priya Marathe: 'नीच आजार, त्या हलकटाशी लढायला...' आस्ताद काळेचं प्रिया मराठेसाठी पत्र

Last Updated:

Priya Marathe: मराठी आणि हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठेचं 31 ऑगस्ट 2025 रोजी निधन झालं. मीरा रोड येथील निवासस्थानी कर्करोगाशी झुंज देताना अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठी आणि हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठेचं 31 ऑगस्ट 2025 रोजी निधन झालं. मीरा रोड येथील निवासस्थानी कर्करोगाशी झुंज देताना अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. अवघ्या 38 व्या वर्षी प्रिया मराठेचं निधन झालं. अभिनेत्रीच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अशातच आता अभिनेता आस्ताद काळेने प्रिया मराठेसाठी पत्र लिहिलं आहे.
 आस्ताद काळेचं प्रिया मराठेसाठी पत्र
आस्ताद काळेचं प्रिया मराठेसाठी पत्र
advertisement

आस्ताद काळेने हे पत्र प्रियासाठी लिहिलं असून तिचा पती शंतनू मोघेलाही धीर दिला आहे. आस्तादची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

'घराचा मेन तंबू प्रियाच..' पत्नीचा शंतनू मोघेला वाटायचा खूप अभिमान, 'तो' VIDEO व्हायरल

आस्तान काळेने पोस्ट शेअर करत लिहिलं, शंतनू...मित्रा....तुझ्याविषयी आपलेपणा, आपुलकी ही कायमच वाटत आली आहे. आता फार फार आदरही वाटतो आहे. वाटत राहील. तुमच्या लढाईत काही मदत नाही करू शकलो याची मनापासून माफी मागतो रे....पण हे पत्र मी लिहीतोय ते मात्र प्रियाला. जमेल तेव्हा please तिच्यापर्यंत पोचवशील?

advertisement

प्रिय प्रिया,

तू शूर आहेस. आजही आहेस. कायमच असशील. आपली काही घट्ट मैत्री म्हणावी अशी नाही. पण चांगले संबंध, परस्परांविषयी आदर,आत्मीयता, आणि एकमेकांची यथेच्छ मस्करी आणि अपमान करायचे एकमेकांना दिलेले अधिकार हे सगळं आहे नक्की. पण तुझ्या घट्ट असलेल्या मित्रपरिवारातील काही लोक माझेही निकटवर्तीय असल्यामुळे तुझ्याविषयी सतत कानावर पडत राहायचं. तू सुरुवातीच्या काळात घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले नाहीत, त्यांच्याविषयी ऐकून मात्र आहे. खात्रीलायक लोकांकडून. त्या कष्टांची प्रसिद्धीरूपी आणि आर्थिक फळं उत्तमरित्या मिळूनही तुझा तसूभरही न बदललेला स्वभाव मात्र मीही पाहिला आहे. अवघड असतं गं हे जमणं. भल्याभल्यांना जमत नाही.

advertisement

आजच्या काळात आपल्यासारख्या अस्थिर क्षेत्रात काम करून मुंबईसारख्या शहरात स्वत:च्या मालकीचं मोठं घर घेणं, ते सजवणं, संसार उभा करणं, हे फार फार अभिमानास्पद आहे. पण हे झालं भौतिक यश. माणूस म्हणून तू जे जे केलं आहेस, त्याला तोड नाही. मस्तीखोर,मनमिळावू,संवेदनशील, थोडीशी ढिश्क्यांव, असे सगळे पैलू तुझ्या वागण्यात मी आजवर बघितले. तुला चिडलेलं पाहिल्याचं मात्र आठवत नाही. वैतागलेली आठवत्येस, पण चिडून कोणाशी बोलताना पाहिल्याचं आठवत नाही. कधी तसं कानावरही आलं नाही. थोडक्यात सांगायचं तर साधारण २० वर्षं तू या क्षेत्रात काम केलंस, पण कधीच तुझ्याबद्दल कोणाला काहीच वाईट बोलताना ऐकलं नाही. वेडंवाकडं कधीच नाही. हे असं वागता येणं खूप अवघड असतं गं. भल्याभल्यांना जमत नाही.

advertisement

आपल्याला हा नीच आजार जडलाय हे पहिल्यांदा समजल्यावर तूही काही काळ खचली असशील, घाबरली असशील. पण मला दिसली ती कंबर कसून त्या हलकटाशी लढायला उभी राहिलेली तू. एकदा मागे रेटलंस त्याला. पण तो परत आला. येतोच तो. पुन्हा लढाई. पुन्हा यातना. जरी आप्तेष्ट जवळ असले, शंतनूसारखा धीराचा, आदर्श जोडीदार सोबत असला, तरी सर्व काही भोगत असलेलं शरीर तुझंच. मानसिक यातना वाटून घेतल्याच असणार सर्वांनी, पण शारीरिक यातना भोगायला तू एकटीच. आणि संपूर्ण एक वर्षं!!!! कुठून आणलीस गं ही ताकद????!!!!! की होतीच तुझ्यात? पण ती दिसण्यासाठी हे कारण उद्भवायची गरज नव्हती ना राव!!!!! तुझ्या अभिनयाबद्दल मी काही बोलणार नाही. त्याच्या पावत्या प्रेक्षकांनी तुला भरभरून दिल्या आहेत. माणूस, मित्र म्हणून मात्र तुझे आभार मानतो प्रिया. खूप शिकवलंस. ताकद दाखवलीस. हसवलंस......तेवढंच लक्षात ठेवायचंय.....हसवलंस.....THANK YOU प्रिया.

advertisement

दरम्यान, 2012 मध्ये प्रियाने अभिनेता शंतनू मोघे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा लेक याच्याशी विवाह केला. या दोघांचे वैयक्तिक जीवन आनंदी आणि समंजस नात्यात गेले. मात्र प्रियाच्या अकाली जाण्याने शंतून तुटून गेला आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Priya Marathe: 'नीच आजार, त्या हलकटाशी लढायला...' आस्ताद काळेचं प्रिया मराठेसाठी पत्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल