केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा 2023 वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला. 80-90च्या दशकातील अभिनेत्री ते आताच्या नवोदित अभिनेत्री सिनेमात पाहायला मिळाल्या. या सिनेमाला आणि सिनेमातील अभिनेत्रींना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
( हेही वाचा - लग्नानंतर अशी दिसतेय नवी नवरी रकुल प्रीत; कामाख्या देवीच्या दर्शनाचे फोटो समोर )
advertisement
नुकताच झी गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात 'बाईपण भारी देवा' या सिनेमानं बाजी मारली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला. 'बाईपण भारी देवा' सिनेमातील एक नाही तर सहा अभिनेत्रींना यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी खास पोस्ट लिहित ही माहिती चाहत्यांना दिली.
"सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, झी गौरव आम्हा सगळ्यांना मिळाला आणि त्याचप्रमाणे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी जो उत्तुंग प्रतिसाद आम्हाला दिलात त्यामुळे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार. झी गौरव ही आम्हाला म्हणजेच तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या चित्रपटाला 'बाईपण भारी देवा! ' ला. असेच प्रेम,आशीर्वाद आयुष्यभर आमच्या बरोबर असू देत,कायम. खास करून तमाम महिलांना मानाचा मुजरा ज्यांनी आम्हाला हा आनंद ,हे उत्तुंग यश दाखवल", अशी पोस्ट अभिनेत्री सुकन्या मोने यांनी शेअर केली.
'बाईपण भारी देवा' सिनेमाविषयी सांगायचं झाल्यास, सिनेमा अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते आणि दीपा परब या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत होत्या. 'बाईपण भारी देवा' या सिनेमानं एकूण 50 दिवसात तब्बल 92 कोटींची कमाई केली. सैराटनंतर सर्वोधिक कमाई करणारा 'बाईपण भारी देवा' हा दुसरा मराठी सिनेमा ठरला आहे.
