घरातील नवीन प्रोमो व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला असून, यात अमाल आणि अभिषेकच्या भांडणाचं कारण समोर आलं आहे. कॅप्टनसी टास्कमध्ये अश्नूर कौरला एका सदस्याला टास्कमधून बाहेर काढायचं होतं. तिने फरहाना भटच्या कॅप्टनसीला फेल म्हटलं.
advertisement
अश्नूरचं बोलणं ऐकून अमाल मलिकने तिच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. तो म्हणाला की, 'ती फक्त भूंकते.' अमालचा हा शब्द ऐकून अभिषेक बजाजला प्रचंड राग आला. त्याने अमालला जोरदार प्रत्युत्तर देत सुनावलं, “तू भूंकतोस!” या शाब्दिक चकमकीचं रूपांतर काही वेळातच हाणामारीत झालं. दोघेही एकमेकांना ढकलून आणि धक्के मारून भांडू लागले. घरातील इतर सदस्यांनी लगेच मध्ये पडून दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर काही सदस्यांनी तर आपले माइक काढून बिग बॉसला कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पण, बिग बॉसनेही यावेळी माघार घेतली नाही. त्यांनी कठोर शब्दांत सुनावलं, “हा माझा पहिला सिझन नाहीये आणि मला अशा प्रकारे ब्लॅकमेल केलेलं चालणार नाही!”
या स्फोटक प्रोमोमुळे सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. काहींनी ‘अभिषेकने योग्य भूमिका घेतली’ असं म्हणून त्याला पाठिंबा दिला, तर काहींनी अमालच्या कमेंटलाही पाठिंबा दिला. आता बिग बॉस या हाणामारीवर काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.