बिग बॉसमधे फुल ऑन राडा आणि भांडणांबरोबर स्पर्धकांचे मुड स्वीग्स आणि लव्ह सीन्सही पाहायला मिळतात. या आधीच्या अनेक सीझनमध्ये हे पाहायला मिळालं आहे. कधी कोणी बाथरूममध्ये तर कोणी स्विमींग पूलमध्ये किस करताना दिसलेत. कोणी बेडरूममध्ये चादरीच्या आत दिसलेत.
( Pranit More : लोकांना ट्रोल करणारा प्रणित मोरे Bigg Boss 19च्या घरात ढसाढसा रडला, कारण काय? )
advertisement
बिग बॉस ओटीटी 2 मध्ये, जाद हदीद आणि आकांक्षा पुरी यांना एका टास्क दरम्यान लिप-लॉक करताना दिसले होते. बिग बॉस 11 मध्ये पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा यांनाही जवळीक साधताना दिसले. बिग बॉस 8 मध्ये गौतम गुलाटी आणि डायंड्रा सोरेस यांचा रोमान्स चर्चेचा विषय बनला होता.
हे संवाद अनेकदा कॅमेऱ्यात कैद होतात ज्यामुळे मीडियाचं लक्ष वेधलं जातं. या आणि अशा अनेक सीन्समुळे प्रेक्षकही अनेकदा नाराज झाल्याचं पाहायला मिळालंय. बिग बॉस 7 मध्ये गौहर खान आणि कुशल टंडन, आणि अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी किस करताना आणि मिठी मारताना दिसले होते. बिग बॉस 9 मध्ये कीथ सिक्वेरिया आणि रोशेल राव एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पाहायला मिळालेत.
गौतम गुलाटी आणि डायंड्रा सोरेसचा बाथरुममध्ये रोमान्स
बिग बॉस 8 मध्ये गौतम गुलाटी आणि डायंड्रा सोरेस बाथरूममध्ये एकमेकांच्या क्लोज आले होते. बिग बॉस 2 मध्ये राहुल महाजन आणि पायल रोहतगी पूलमध्ये जवळीक साधताना दिसले होते. रुबिना दिलेकने तिचा पती अभिनव शुक्लासोबत बिग बॉस 14 मध्ये एन्ट्री केली होती. सीझनच्या शेवटी दोघांमधले संबंध अखेर समोर आले होते.
बिग बॉस 14 दरम्यान अली गोनी आणि जास्मिन भसीनमध्येही प्रेमसंबंध निर्माण झाले. या सीझनमध्येच त्यांनी त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं होतं. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना मिठी मारणे आणि त्यांचं सांत्वन करणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे.