'बिग बॉस १९' या सीझनने टीव्ही आणि ओटीटीवर यशाचे सर्व विक्रम मोडल्यानंतर, याचं जंगी सेलिब्रेशन दुबईत सुरू आहे. प्रसिद्ध उद्योगपती रिझवान साजन यांनी ६ आणि ७ जानेवारी २०२६ रोजी एका शाही पार्टीचं आयोजन केलं होतं. रिझवान साजन यांच्या निवासस्थानी ६ जानेवारीला एका भव्य डिनरने या सेलिब्रेशनची सुरुवात झाली. त्यानंतर ७ जानेवारीला दुबईच्या समुद्रात एका आलिशान यॉटवर पार्टीचा कल्ला झाला. या पार्टीला सीझन १९ चे अनेक गाजलेले चेहरे उपस्थित होते. पण, सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या त्या तान्या मित्तलवर. आपल्या ग्लॅमरस लूकने तिने चाहत्यांना घायाळ केलं. पण, या आनंदाच्या वातावरणातही वादाची ठिणगी पडली असून त्याची केंद्रबिंदु ठरली आहे तान्या मित्तल.
advertisement
शो संपल्यानंतरही तान्या मित्तल नाराज
यॉटवरील पार्टीत तान्या आणि इतर स्पर्धकांमधील दुरावा स्पष्टपणे दिसून आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना तान्याचा राग अनावर झाला. ती म्हणाली, "लोकांना टीका करणं सोपं असतं, पण एकदा माझ्या जागी येऊन बघा. एका अशा घरात राहणं, जिथे उरलेले १६ जण तुमची खिल्ली उडवतायत आणि तुमच्या विरोधात उभे आहेत, हे सोपं नसतं. माझ्या बालपणापासूनच्या संघर्षाबद्दल लोक बोलतायत. आता माझं घर समोर आल्यावरही लोक म्हणतात की, ते माझं नाही तर माझ्या मामाचं आहे. लोकांना सत्य समजूनच घ्यायचं नसेल, तर मी कशाला स्पष्टीकरण देत बसू?"
कोण आहे आयुष संजीव, ज्याने दिले Bigg Boss Marathi 6 मध्ये येण्याचे संकेत? आहे सलमान खानशी खास नातं
चर्चा अशी आहे की, इतर स्पर्धकांसोबतचे खटके आणि तोच तिथला नकारात्मक माहोल पाहून तान्याने ही दुबईतील पार्टी वेळेच्या आधीच सोडली. ती तिथून रागाच्या भरात निघून गेल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठल्या आहेत. आता या गोष्टी कितपत खऱ्या आहेत, हे येणारा काळच सांगेल.
