काही दिवसांआधी सूरजने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तो ट्रकमधून सिमेंटच्या गोण्या उतलताना दिसत होता. त्याच्या नव्या घरासाठी लागणारं सामान तो स्वत: आणत होता. त्यानंतर आता त्याने नवा व्हिडिओ शेअर केला आहे. फावडा आणि सिमेंट हातात घेऊन काम करतोय. तर घराच्या कच्च्या भिंतींना पाणी देताना दिसतोय. मोठ्या हिरहिरीने तो कामगारांना मदत करतोय. "माझ घर. लवकरचं बिग बॉसचा बंगला", असं कॅप्शन देत सूरजने घराच्या बांधकामाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
advertisement
( कधी ढगात हानतो हेलिकॉप्टर, तर कधी बुक्कीत आणतो टेंगुळ; सूरज चव्हाणचे TOP 5 गोलीगत डायलॉग )
सूरजने बिग बॉससारखा शो जिंकला. त्याला अनेकांनी मदत केली. त्याच्याकडे पैसे आले एक सिनेमाही मिळाला. हालाकीचे दिवस काढणाऱ्या सूरजचं आयुष्य बदललं पण त्याचं वागणं बदललं नाही. त्याच्यातील नम्रपणा आजही तसाच आहे. त्याची मातीशी जोडलेली नाळ कायम तशीच राहिली.
स्वत:च्या घरासाठी राबणाऱ्या सूरजला पाहून महाराष्ट्रातील त्याच्या तमाम चाहत्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. एका युझरने लिहिलंय,"असंच साधेपण कधीच सोडू नको हीच तुझी ओळख आहे." दुसऱ्या युझरने लिहिलंय,"ज्याला दुनिया हसली, त्याने दुनियेला रडवल आणि हसायला शिकवलं!" आणखी एका युझरने लिहिलंय, "ज्याला कष्टाची लाज नाही तो व्यक्ति आयुष्यात कधीच उपाशी राहत नाही."
सूरज चव्हाण लवकरच केदार शिंदे यांच्या झापुक झुपूक या सिनेमात दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. पुढील काही दिवसात सिनेमाचं शुटींग सुरू होणार आहे.