Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'चा मुहूर्त संपन्न! पण त्याची हिरोईन कोण? PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
suraj chavan jhapuk jhupuk movie muhurat : बिग बॉस संपल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात केदार शिंदे यांनी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सूरज चव्हाण या सिनेमात प्रमुख भूमिकेत असणार आहे. सूरज बरोबर हिरोईन असणार असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. अखेर त्याचं उत्तरही मिळालं आहे.
मुंबई : बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण लवकरच नव्या मराठी सिनेमात दिसणार आहे हे सर्वांना माहिती होतं. सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' या मराठी सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी बिग बॉसच्या फिनालेमध्ये 'झापुक झुपूक' या सिनेमाची घोषणा केली होती. बिग बॉस संपल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात केदार शिंदे यांनी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सूरज चव्हाण या सिनेमात प्रमुख भूमिकेत असणार आहे. सूरज बरोबर हिरोईन असणार असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. अखेर त्याचं उत्तरही मिळालं आहे.
सूरज चव्हाणच्या 'झापुक झूपक'चा मुहूर्त नुकताच संपन्न झाला आहे. सिनेमाच्या मुहूर्तासाठी सूरज चव्हाण मुंबईत आला आहे. सिनेमाच्या मुहूर्ताच्या दिवशी सिनेमाचं पहिलं पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. अभिनेत्री दिपाली पानसरे हिने सिनेमाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर केले आहेत.
advertisement
'झापुक झुपूक' सिनेमात सूरज चव्हाणची हिरोईन कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष असतं. समोर आलेल्या फोटोंमध्ये टेलिव्हिजनच्या तीन नायिका दिसत आहेत. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेची अभिनेत्री जुई भागवत, 'अबीर गुलाल' मालिकेची नायिका पायल जाधव आणि 'आई कुठे काय करते' मालिकेतील पहिली संजना अभिनेत्री दिपाली पानसरे दिसत आहे. त्याचबरोबर अभिनेता पुष्कराज चिरपुटकही आणि 'पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेतील अभिनेता इंद्रलीन कामत देखील दिसत आहे.
advertisement
advertisement
या फोटोवरून हे लक्षात येत आहे की सूरजची हिरोईन जुई भागवत, पायल जाधव किंवा दिपाली पानसरे असू शकते. 'झापुक झुपूक' सिनेमाचा मुहूर्त पार पडल्याचं कळताच सूरज चव्हाणचे चाहते खुश झाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 25, 2024 12:55 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'चा मुहूर्त संपन्न! पण त्याची हिरोईन कोण? PHOTO