Suraj Chavan: 'माझा देव' गोलीगत सूरज चव्हाणची केदार शिंदेंसाठी हृदयस्पर्शी पोस्ट!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Suraj Chavan-Kedar Shinde: गोलीगत सूरज चव्हाणने बिग बॉसच्या प्रेक्षकांचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं मन जिंकून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. बिग बॉस विनर बनल्यापासून सूरज झापुक झुपूक अंदाजात चर्चेत आहे.
मुंबई : गोलीगत सूरज चव्हाणने बिग बॉसच्या प्रेक्षकांचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं मन जिंकून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. बिग बॉस विनर बनल्यापासून सूरज झापुक झुपूक अंदाजात चर्चेत आहे. त्याच्यावर लोकांकडून प्रेमाचा वर्षाव होतोय. बाहेर आल्यापासून तो सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेच. अशातच सूरज चव्हाणची नवी पोस्ट लक्ष वेधून घेणारी आहे.
सूरज चव्हाणने लेखक, दिग्दर्शक केदार शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. केदार शिंदेना मिठी मारतानाचा फोटो सूरजने त्याच्या इंस्टावर शेअर केला आहे. हा फोटो अगदी काहीच वेळात व्हायरल झाला आणि लोकांचं लक्ष वेधून घेऊ लागला.
advertisement
सूरजने केदार शिंदेंसोबत फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझा देव', ही पोस्ट व्हायरल होताच लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव पहायला मिळाला. अनेकांनी सूरजला केदार शिंदे स्वामी म्हणून भेटले आहेत, ज्याला हात लावेल, त्याला सोने करणारी व्यक्ती केदार शिंदे, सहनशक्तीच्या छातीवर पाय देऊन समोर जाणारा सूरज भाऊ चव्हाण, संधी एकदाच मिळते सूरज त्याचे सोने कर, स्वतःच्या हिमतीवर मिळवलेले यश, अशा अनेक कमेंटचा पाऊस पहायला मिळत आहेत.
advertisement
advertisement
दरम्यान, बिग बॉसच्या घरात सुरुवातीला सूरजला गेम कळाला नाही, खेळला मात्र हळूहळू त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं. प्रेक्षकांचं मन जिंकून आणि जास्त वोटिंग मिळवून त्याने ही ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं आणि अखेर 70 दिवसांच्या शोचा राजा, विनर ठरला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2024 4:53 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Suraj Chavan: 'माझा देव' गोलीगत सूरज चव्हाणची केदार शिंदेंसाठी हृदयस्पर्शी पोस्ट!