Cyber Fraud: दादरमधील उच्च शिक्षित महिलेसोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं

Last Updated:

दादरमधील एका महिलेला OLXवर पुस्तक विक्रीच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने फसवून तिच्या बँक खात्यातील एक लाख पंचावन्न हजार रुपये गायब केले. ऑनलाईन व्यवहारात सतर्कता आवश्यक.

फोटो सौजन्य- AI
फोटो सौजन्य- AI
मुंबई : आजकाल तुमचं एक क्लिकही धोकादायक ठरु शकतं, कधी कुठल्या गोष्टीतून फ्रॉड होईल आणि तुमचं बँक खातं रिकामं होईल याचा विचारही करू शकणार नाही. एका साध्या दिसणाऱ्या ऑनलाईन पुस्तकविक्रीत उच्च शिक्षित महिलेला फसवल्याचा प्रकार समोर आला. दादरमधील एका महिलेचं बँक खातं चक्क रिकामं झालं.
आपली मुलगी उच्चशिक्षित असल्याने घरात पडून असलेली महागडी पुस्तके विकण्याचा विचार या महिलेने केला. परिचितांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तिने ती पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी अपलोड केली. ओएलएक्सवर पुस्तकांच्या फोटोसह किंमत अपलोड केल्यानंतर महिलेला पुस्तक विकत घेण्यासाठी समोरुन फोन आला. जी पुस्तक इतके दिवस कोणी विकत घेण्यासाठी तयार नव्हतं, ती पुस्तकं अचानक घ्यायला तयार झाल्याने महिला खूश झाली.
advertisement
ओएलएक्सवर फोटो टाकताच तिचा फोन सतत वाजू लागला. वेगवेगळ्या अनोळखी क्रमांकांवरून येणाऱ्या कॉलमध्ये एक जण मात्र जरा जास्तच आपुलकी दाखवू लागला. बोलण्यातले गोडवे आणि आश्वासने देत त्याने स्वतःला पुस्तकांचा खरेदीदार म्हणून पुढे केले. तुमची पुस्तके मीच घेतो, पण ऑनलाईन व्यवहार करावा लागेल असं त्याने या महिलेला सांगितलं.
महिला त्याच्या गोड बोलण्याला भुलली. त्या व्यक्तीने अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितलं. सुरुवातीला थोडी शंका आली तरी समोरच्या गोड बोलण्याने ती वितळली. अ‍ॅपमध्ये माहिती भरताच मोबाईलवर ओटीपी येऊ लागले. माझा सहकारी कम्प्युटरवरूनच व्यवहार करतो, त्यामुळे तुम्ही प्रोसेस पूर्ण करा असं तो म्हणाला.व्हेरिऱफिकेशनच्या नावाखाली सुरु झालेल्या क्लिक-क्लिकमध्ये महिलेला कळलंही नाही आणि तिच्या बँक खात्यातून एक लाख पंचावन्न हजार रुपये परस्पर गायब झाले.
advertisement
महिलेच्या मनात काहीतरी चुकल्याची जाणीव झाली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घाईघाईने बँकेत संपर्क साधल्यावर सत्य समोर आलं. महिलेच्या खात्यावरील सगळी रक्कम गायब झाली होती. गोड बोलण्याला ती फसली आणि त्याने तिचा गेम केला. सहज विश्वास ठेवल्याची महिलेला खूप मोठी किंमत मोजावी लागली.
अखेर महिलेनं पोलीस ठाण्यात संपूर्ण प्रकार सांगितला आणि अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुस्तक विकत घेण्याच्या बहाण्याने त्या या महिलेचं बँक खातंच रिकामं केलं. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यायला हवी. ऑनलाईन जाहिराती, ऑफर्सला भुलून पेमेंट करताना किंवा अचानक तुमचा नंबर वापरून OTP मागितला तर देऊ नका. त्यामुळे तुमचं बँक खातं रिकामं होण्याचा धोका असतो.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Cyber Fraud: दादरमधील उच्च शिक्षित महिलेसोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement