पूजाने टाळलं, तिच्या आईलाही नाही आली दया, गोळी झाडण्याआधी गोविंदसोबत काय घडलं? खळबळजनक माहिती समोर

Last Updated:

Pooja Gaikwad Case: नर्तिका पूजा गायकवाड अटकेत असताना गोविंद बर्गेसोबत जीव देण्यापूर्वी नेमकं काय घडलं? याची माहिती समोर आली आहे.

News18
News18
बीडच्या लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचं आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. नर्तिका पूजा गायकवाडसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून बर्गे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पूजाने गोविंदला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याची आर्थिक लूट केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पूजा गायकवाडला अटक केली आहे. तिची कसून चौकशी केली जात आहे.
एकीकडे पूजा अटकेत असताना गोविंद बर्गेनं आत्महत्या पूर्वी नेमकं काय घडलं? याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद बर्गे हा मागील काही दिवसांपासून तणावात होता. कला केंद्रातील नर्तकी पूजा त्याला पैसा, जमीन आणि घरासाठी दबाव आणत होती. गोविंदने आपल्या मित्राला याबद्दल सांगितले. कला केंद्रात गोविंद आणि नर्तकी पूजा गायकवाड यांची ओळख झाली. पूजा आणि गोविंद यांचे प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर गोविंदने प्लॉट, शेतजमीन, आयफोन, महागडे दागिने, बुलेट असे सर्वकाही महागड्या गोष्टी पूजाला दिल्या. मात्र, पूजाच्या अपेक्षा वाढत होत्या.
advertisement
गोविंदने गेवराईत आलिशान बंगला बांधला. त्या बंगल्यात गोविंद याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि वडील राहत होते. मात्र, गोविंदच्या या बंगल्यात पूजा दोन दिवस मुक्कामी गेली. तेव्हा तिला हा बंगला इतका जास्त आवडला की, तिने हा बंगला आपल्या नावावर करावा, यासाठी गोविंदकडे तगादा लावला. तुझ्यासाठी दुसरा असाच बंगला बांधून देतो, असे गोविंदने सांगितलं. पण पूजा ऐकण्यास तयार नव्हती. बंगला नावावर केला नाही, तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन, अशी धमकी नर्तकीने दिली. तसेच तिने गोविंदसोबतचा संपर्क तोडला. पूजा बोलत नसल्याने गोविंद अधिक तणावात आला.
advertisement

मैत्रिणीला संपर्क केला पण...

घटनेच्या दिवशी गोविंदने पूजाला बोलण्यासाठी सर्वकाही प्रयत्न केले. पूजा काम करत असलेल्या कला केंद्रात तो पोहोचला. मात्र, तिथे तिची भेट होऊ शकली नाही. तिच्या मैत्रिणीला संपर्क करून त्याने बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला पूजाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पूजाने आपल्याला बोलावे याकरिता तो प्रत्येक प्रयत्न करत होता. शेवटी गोविंद बर्गे हा थेट पूजाच्या घरी तिच्या आईला भेटण्यासाठी गेला.
advertisement

पूजा भेटली नाही अन् तिच्या आईलाही दया नाही आली

"पूजाला काहीतरी समजावा, ती माझ्याशी बोलत नाही, असे त्याने पूजाच्या आईला सांगितले. मात्र, पूजाच्या आईलाही गोविंदची दया आली नाही. विनवणी करूनही पूजाच्या आईकडून त्याला काही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. गोविंदला माहिती होते की, पूजा ही कला केंद्रात आहे… तिला समजून सांगूनही ती ऐकत नाही. किमान तिच्या आईला बोलल्यावर काहीतरी मार्ग निघेल, असं गोविंदला वाटलं. मात्र, पूजाच्या आईकडूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे तणावात असलेल्या गोविंदने पूजाच्या घराबाहेरच कारमध्ये स्वत:वर गोळी झाडली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पूजाने टाळलं, तिच्या आईलाही नाही आली दया, गोळी झाडण्याआधी गोविंदसोबत काय घडलं? खळबळजनक माहिती समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement