समोर आलेल्या प्रोमोमध्ये प्रभू 'तुमच्यासारखं नाही' असं म्हणत ऋतुजाची एक्टिंग करतो. त्याची बॉडी लँग्वेज, बोलण्याची स्टाइल आणि हावभाव पाहून घरातील काही स्पर्धक हसू लागतात. मात्र त्यानंतर रुचिता देखील थांबत नाही. ती 'म्युट, म्युट' असं म्हणत प्रभूचीच एक्टिंग करू लागते. सुरुवातीला मस्करी करत असताना हळूहळू त्याचा सूर बदलतो.
( 'दादांनी संधी दिली म्हणून मी...' अजित पवारांच्या निधनानंतर घनश्याम दरोडे भावुक, VIDEO )
advertisement
हा सगळा प्रकार पाहून सागर कारंडे संतापतो. तो दमदाटी करत थेट प्रभूला म्हणतो, "ए प्रभू, आवाज जास्त चढवू नकोस." सागरचा हा थेट आणि कडक सूर ऐकून प्रभू क्षणभर गोंधळतो. तो लगेचच प्रत्युत्तर देत विचारतो, "काय बोलला?" यावर सागर म्हणतो, "कोण काय बोलत नाही याचा अर्थ असा नाही होत की तू आता कोणाला काही बोलशील".
प्रभू आणि सागर कारंडे यांच्यातील वादामुळे घरातील वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं. प्रभू मात्र स्वतःची बाजू मांडताना शांतपणे म्हणतो, "मी बोललोच नाही काही." त्याचं हे उत्तर ऐकून वाद आणखी वाढेल की शांत होईल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहतं.
हा संपूर्ण सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण सागर कारंडेच्या थेट आणि स्पष्ट बोलण्याचं समर्थन करत आहेत, तर काही जण प्रभूने घेतलेली शांत भूमिका योग्य असल्याचं म्हणत आहेत.
