काय आहे 'सात खून माफ'?
'सात खून माफ' मध्ये प्रियंकाने सुजाना अॅना-मारिया जोहानेस नावाची अँग्लो-इंडियन स्त्री साकारली आहे. ही भूमिका अतिशय गुंतागुंतीची, भावनिक आणि सायकोलॉजिकल आहे. प्रियंकाने या चित्रपटात सात वेगवेगळ्या नवऱ्यांबरोबर लग्न करून, प्रत्येकाचा खून करणाऱ्या एका बाईची व्यक्तिरेखा कमालरित्या साकारली आहे. रस्किन बॉन्ड यांच्या 'सुजानाचे सात पती’ या लघुकथेनं प्रेरित असलेलं या चित्रपटाचं कथानक आहे. ही कथा एका अशा स्त्रीची आहे जिला आयुष्यात खरं प्रेम हवं असतं. पण प्रत्येक लग्नानंतर तिला फसवणूकच मिळते, म्हणून ती प्रत्येक नवऱ्याचा खून करते.
advertisement
नील नितिन मुकेश, जॉन अब्राहम, इरफान खान, अनु कपूर, नसीरुद्दीन शाह, विवान शाह, ऊषा उथुप हे कलाकार 'सात खून माफ' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विशाल भारद्वाज
यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, त्यांनी या विचित्र आणि गूढ कहाणीला प्रभावीपणे मांडलं आहे. या चित्रपटाचं बजेट फक्त 15 कोटी रुपये होतं. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल 33 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला.
'सात खून माफ' कुठे पाहता येईल?
'सात खून माफ' या चित्रपटात भरपूर सायकोलॉजिकल ड्रामा, थ्रिलर, आणि सस्पेन्स आहे. प्रत्येक नवऱ्याची वेगळी कथा आणि त्याच्या मृत्युमागचं कारण प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. विशेष म्हणजे, खून करूनही सुजाना कधीच अपराधी वाटत नाही. हेच या चित्रपटाचं वेगळेपण ठरतं. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.‘सात खून माफ’ म्हणजे प्रेम, फसवणूक, क्रूरता आणि सस्पेन्सने भरलेली एक कहाणी. हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.