TRENDING:

Rashmika Mandana : 'छावा'च्या ट्रेलरला लंगडत आली रश्मिका, पायाला झालंय काय? X-Ray रिपोर्ट व्हायरल

Last Updated:

Rashmika Mandanna X-Ray Report : रश्मिकाच्या पायात तीन फ्रॅक्चर आहे. तिचे मसल्स टिअर झाले आहेत.रश्मिकाचे एक्सरे रिपोर्ट्स समोर आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या पायाला दुखापत झाली आहे हे सर्वांनाच माहिती आहे. अभिनेत्री जिम करत असताना तिचा अपघात झाला ज्यामुळे तिच्या पायाला फ्रँक्चर करण्याची वेळ आली. रश्मिकाने मुंबईत 'छावा' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. यावेळी पायाच्या दुखापतीमुळे ती लंगडत होती. थेट व्हिलचेअरवर रश्मिका त्याठिकाणी पोहोचली. स्वत: रिमोट कंट्रोलवाल्या व्हिलचेअरने रश्मिका सध्या सर्वत्र प्रवास करतेय. रश्मिकाच्या पायात तीन फ्रॅक्चर आहे. तिचे मसल्स टिअर झाले आहेत. त्यामुळे तिला स्वत:च्या पायावर उभं राहणं कठिण झालं आहे. रश्मिकाच्या पायाच्या सीटीस्कॅन रिपोर्ट्स समोर आले आहेत.
रश्मिका मंदाना
रश्मिका मंदाना
advertisement

रश्मिका मंदान्नाने इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. तसंच तिने स्वत:चे मेडिकल रिपोर्ट आणि एक्स-रे फोटोही शेअर केले आहेत.

Rashmika Mandana : 'वेदनाही कोपऱ्यात रडत असाव्यात', रश्मिकाला पाहून नेटकरी असं का म्हणाले? VIDEO

रश्मिकाने शेअर केले पायाचे एक्सरे 

पहिल्या व्हिडिओ क्लिपमध्ये रश्मिका व्हीलचेअरवर बसलेली आणि 'छावा' ट्रेलर लाँचसाठी तयार होताना दिसत आहे. यानंतर, व्हिडिओमध्ये तिचा सह-अभिनेता विकी कौशल तिला मदत करताना दिसत आहे. पुढच्या क्लिपमध्ये, रश्मिकाची मैत्रिण तिच्या पायाला बांधलेल्या प्लास्टरवर काहीतरी लिहिताना दिसत आहे. पुढील फोटोमध्ये रश्मिकाचे मेडिकल रिपोर्ट्स आणि एक्स-रे पाहायला मिळत आहेत.

advertisement

रश्मिकाच्या पायात 3 फ्रॅक्चर

रश्मिकाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "माझ्या मुलींनी खूप गोंडस बनवले आहे, पण आतमध्ये 3 फ्रॅक्चर आणि मसल्सला दुखापक झाली आहे. मी 2 आठवड्यांत माझा पाय खाली ठेवला नाही, मला माझ्या स्वतःच्या दोन पायांवर उभं राहायचं आहे. मला खरोखर चुकल्यासारखं वाटतंय.  कृपया स्वतःची काळजी घ्या. आणि जेव्हा लोक तुम्हाला हे सांगतात तेव्हा ते हलक्यात घेऊ नका..!! तुमचे सर्व प्रेम आणि शक्ती मी अतिशय प्रेमाने जपत आहे. तुम्हा सर्वांना सर्वात मोठी मिठी."

advertisement

जीम करताना रश्मिकाला दुखापत 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

12 जानेवारीला जिममध्ये वर्कआउट करताना रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली होती. असे असूनही ती आपले काम करत आहे. 'पुष्पा 2: द रुल'नंतर ती 'छावा'मध्ये दिसणार आहे. या पीरियड ड्रामामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. 14 फेब्रुवारीला चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. विकी या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. राणी येसूबाई ही मराठा शासकाची पत्नी होती आणि त्यांना मराठा साम्राज्याच्या छत्रपती महाराणी असे संबोधले जात असे. रश्मिका ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Rashmika Mandana : 'छावा'च्या ट्रेलरला लंगडत आली रश्मिका, पायाला झालंय काय? X-Ray रिपोर्ट व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल