advertisement

Rashmika Mandana : 'वेदनाही कोपऱ्यात रडत असाव्यात', रश्मिकाला पाहून नेटकरी असं का म्हणाले? VIDEO

Last Updated:

rashmika mandanna limping : छावाच्या ट्रेलर लाँचवेळी रश्मिका मंदानाने हजेरी लावली होती. रश्मिकाला पाहून नेटकऱ्यांनी 'वेदनाही कोपऱ्यात रडत असाव्यात' असं म्हणत ट्रोल केलं आहे. रश्मिकाला नेटकरी असं का म्हणाले?

रश्मिका मंदाना
रश्मिका मंदाना
मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या पायाला दुखापत झाली आहे. रश्मिकाच्या पायाला फ्रॅक्चर करण्यात आलं आहे. पायाला गुखापत झालेली असली तरी रश्मिका शो मस्ट हो ऑन या तत्त्वावर चालताना दिसतेय. रश्मिका आगामी छावा सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.  विकी कौशलचा बहुप्रतिक्षित 'छावा' या सिनेमाचा ट्रेलर 22 जानेवारी बुधवारी लाँच करण्यात आला. विकी आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीम व्यतिरिक्त या कार्यक्रमात रश्मिका मंदान्ना देखील उपस्थित होती. रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली होती आणि ती लंगडत होती, तरीही ती सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. यावेळी विकी कौशल अभिनेत्रीची काळजी घेताना दिसला.
दुखापतीमुळे रश्मिका लंगडत असल्याचे विकी कौशलने पाहिले तेव्हा तो लगेच तिच्या मदतीसाठी पुढे आला. विकीने रश्मिकाचे दोन्ही हात धरले आणि हळूच तिला स्टेजवर चढण्यास मदत केली. मग हळूच त्याला सोबत घेऊन खुर्चीवर बसवले. विकीचा हा हावभाव पाहून रश्मिका हसली आणि त्याची फॅन झाली.
advertisement

विकी कौशलचं कौतुक 

त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रश्मिका मंदान्ना आणि विकी कौशलचा हा व्हिडिओ पापाराझीनेही शेअर केला आहे, ज्यावर अनेक कमेंट येत आहेत. चाहत्यांनी विकीचे कौतुक केले आणि तो खूप चांगला स्वभावाचा असल्याचे सांगितलं. तर काही युझर्सनी रश्मिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तिच्या पायाला इतकं लागलेलं असताना ती इतक्या घाईत का आहे? ती व्हीलचेअर देखील घेऊ शकते.
advertisement
advertisement

एकीकडे कौतुक दुसरी रश्मिका ट्रोल 

एका युझरने कमेंट करत लिहिलंय, 'इतकं नाटक रचण्याची काय गरज आहे? जर तुम्हाला चालण्यात अडचण येत असेल तर तुम्ही क्रॅच स्टिक वापरू शकता. असे करून त्यांची अवस्था बिकट होत आहे. रश्मिकाने जरा आधार घ्यावा. दुसऱ्या यूजरनं लिहिलंय, 'एवढी उडी का? जेव्हा आधार असेल तेव्हा ती हळू आणि आरामात चालू शकते. आणखी एका युझरने कमेंट करत लिहिलंय, 'एवढ्या उड्या मारण्याचं नाटक का करता? वेदनाही कुठेतरी कोपऱ्यात रडत असाव्यात.
advertisement

रश्मिका जिममध्ये जखमी

दोन आठवड्यांपूर्वी जिममध्ये वर्कआऊट करताना रश्मिका मंदानाच्या पायाला दुखापत झाली. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहित अभिनेत्रीने हे सांगितलं होतं. पण बुधवारी जेव्हा ती मुंबई आणि हैदराबाद विमानतळावर व्हीलचेअरवर बसून लंगडत चालताना दिसली तेव्हा तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले.
advertisement

'छावा' 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे

'छावा' बद्दल बोलायचे तर यात अक्षय खन्ना देखील आहे. तो औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. विकी कौशल छत्रपती शिवाजीच्या भूमिकेत असून रश्मिका महाराणी येशुबाईच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rashmika Mandana : 'वेदनाही कोपऱ्यात रडत असाव्यात', रश्मिकाला पाहून नेटकरी असं का म्हणाले? VIDEO
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement