पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित बहूचर्चित आणि बहूप्रतिक्षित चित्रपट 'छावा' आज, 14 फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आज पहिल्याच दिवशी चित्रपट हाऊसफूल्ल झाल्याचे चित्र होते. पुण्यात देखील चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. चित्रपट पाहून आल्यानंतर लोकल18 सोबत बोलताना चाहत्यांनी व शिवशंभू प्रेमींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
advertisement
छावा चित्रपट अतिशय उत्तम असून चित्रपट पाहताना अंगावर शहारे येत हते. तसेच मन अतिशय हळव झालं. असे चित्रपट तयार झाले पाहिजेत. चित्रपट पाहताना मन भरून आलं. त्यांनी जे सोसलं आहे ते सगळं आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळत आहे. विकी कौशल आणि रश्मीका मंदाना यांची भूमिका ही अतिशय छान आहे, असं एका चाहतीनं सांगितलं.
पिच्चरटाईप Love Story! त्यांनी लग्न केलं अन् गावात कलम 144 लागलं, मग जे झालं...
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित या आधी देखील अनेक चित्रपट हे येऊन गेले आहेत. परंतु हा बहूचर्चित असा चित्रपट आहे. शेवटी महाराजांच्या मृत्यूची जी दृश्यं आहेत, ती पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला पाहिजे, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.
दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाला चाहत्या वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत असून सकाळ पासूनच शो चे बुकिंग हे फुल्ल आहेत. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. अनेक वादविवादा नंतर खर तर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सिनेमातून मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.