'माणसाला एकटेपण नव्हे, पोरकेपणाची भीती', मुक्ता बर्वेचा 56 मिनिटांचा मनाला भिडणारा VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Mukta Barve Movie : अभिनेत्री मुक्ता बर्वे नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमातील तिचा मनाला स्पर्शून जाणारा टीझर समोर आला आहे.
अभिनेत्री मुक्ता बर्वे जेव्हाही मोठ्या पडद्यावर येते तेव्हा प्रेक्षकांसाठी काही तरी खास घेऊन येते. काही दिवसांआधीच तिचा असंभव हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर मुक्ता आता एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचा 56 सेकंदाचा व्हिडीओ मनाला स्पर्शून जाईल.
'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर' आणि 'बिन लग्नाची गोष्ट'सारख्या सिनेमातून नात्यांवर संवेदनशील भाष्य मायाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून सिनेमाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. माणूस खरंतर एकटेपणाला घाबरत नाही, तर पोरकेपणाच्या भावनेला घाबरतो. कुणीतरी कुठेतरी आपल्यासाठी आहे ही जाणीवही पुरेशी असते जगायला.ही मुक्ता बर्वेची वाक्य मनाला स्पर्शून जातात.
( 'त्यादिवशी अजितदादा 2 तास नॉनस्टॉप...', गायक राहुल वैद्यने शेअर केला अजित पवारांचा तो शेवटचा VIDEO )
advertisement
'माया'चा टीझर हा भाव अतिशय हळुवारपणे उलगडनाता दाखवला आहे. नात्यांमध्ये अडकलेलं मन, त्यातून तयार होणारी मानसिकता आणि आयुष्य प्रवाही होण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता यावर हा सिनेमा भाष्य करतो.
चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने हाऊस फादरची भूमिका साकारली आहे. ही भूमिका नात्यांकडे पाहाण्याचा वेगळा, समजूतदार दृष्टिकोन दाखवतो. मुक्ता बर्वे, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी हा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या माणसांच्या भावविश्वाचं प्रभावी प्रतिनिधित्व करतात. तर गिरीश ओक यांची व्यक्तिरेखा विशेष लक्ष वेधून घेते. आजाराने ग्रस्त असलेला, अंतर्मुख आणि काहीसा विचित्र स्वभाव असलेला हा माणूस मनात खोलवर साठवून ठेवलेल्या आघातांमुळे इतरांपासून दुरावलेला दिसतो. त्यांचा अस्वस्थपणा आणि मनातील अढी कथेला गंभीर आणि विचारप्रवर्तक वळण देताना दिसते.
advertisement
सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, "बर्याच वेळा आपण मनाला गाठी मारून ठेवतो. आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या काही घटना आपल्यावर खोलवर आघात करतात आणि त्यालाच आपण संपूर्ण आयुष्य समजतो. त्या अनुभवांवर प्रतिक्रिया देण्यात किंवा मनात अढी धरून ठेवण्यात आपण खूप काळ घालवतो. काळाच्या ओघात ही अढी सुटली, तरच आयुष्य प्रवाही होऊ शकतं. ही अढी नात्यांमधून, जिव्हाळ्यातून सुटते आणि त्यानंतर आयुष्य पुन्हा एकदा पुढे सरकायला लागतं. 'माया' हा सिनेमा याच भावनिक प्रवासावर भाष्य करतो."
advertisement
'माया' हा सिनेमा 27 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे. टीझरमुळेच सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 6:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माणसाला एकटेपण नव्हे, पोरकेपणाची भीती', मुक्ता बर्वेचा 56 मिनिटांचा मनाला भिडणारा VIDEO










