advertisement

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अर्थखातं नाहीच, फडणवीसांनी कोणती खाती दिली?

Last Updated:

Sunetra Pawar Portfolio: कुटुंबावर ओढावलेले संकट बाजूला सारून पक्षाच्या भविष्याकरिता धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार
मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची आणि उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे सुनेत्रा पवार यांनी अत्यंत धीरोदात्तपणे समोर येऊन आपल्या ताब्यात घेतली. शनिवारी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या तसेच आमदारांच्या समक्ष त्यांचा शपथविधी कार्यक्रम झाला. अत्यंत साधेपणाने शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. शपथविधीच्या दोन तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपही जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांची जबाबदारी सोपवली. अजित पवार यांच्याकडे असलेले वित्त आणि नियोजन खाते तूर्त सुनेत्रा पवार यांच्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोपवले नाही. राष्ट्रवादीला अर्थखाते देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचा हिरवा कंदील नव्हता.

राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन ठराव, सर्वाधिकार सुनेत्रा पवारांना!

advertisement
विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीत एकमुखाने सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. तसेच विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा अजितदादा पवार यांना देण्याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला. म्हणजेच व्हीप काढण्याचे आणि विधिमंडळ कामकाजाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत.
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत हे दोन्ही ठराव घेण्यात आले.
advertisement

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सध्या कोण कोण आहेत?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती आणि इतर शिल्लख खाती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नगर विकास आणि गृहनिर्माण (सामाजिक उपक्रम)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार - अर्थ व नियोजन, उत्पादन शुल्क
1)चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
2) राधाकृष्ण विखे पाटील- जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
advertisement
3) हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
4) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज
5) गिरीश महाजन - आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
7) गणेश नाईक - वन
8) दादाजी भुसे - शालेय शिक्षण
9) संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
advertisement
10) दत्तात्रय भरणे - कृषिमंत्री
11) मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12) उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
13) जयकुमार रावल - पणन, राजशिष्टाचार
14) अदिती तटकरे - महिला व बालविकास
15) शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम
17) जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
18) नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
advertisement
19) संजय सावकारे - कापड
20) संजय शिरसाट - सामाजिक न्याय
21) प्रताप सरनाईक - परिवहन
22) भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन
23) मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
24) नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
25) आकाश फुंडकर - कामगार
26) बाबासाहेब पाटील - सहकार
27) प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
advertisement
28) पंकजा मुंडे - पशु संवर्धन, पर्यावरण, वातावरण बदल
29) अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास, उर्जा नूतनीकरण
30) अशोक उईके - आदिवासी विकास
31) शंभूराज देसाई - पर्यटन, खाण, व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
32) आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान
33) छगन भुजबळ- अन्न आणि नागरी पुरवठा
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अर्थखातं नाहीच, फडणवीसांनी कोणती खाती दिली?
Next Article
advertisement
Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • घरातील सोन्याबाबत उद्या होणार मोठा फैसला

  • एका निर्णयाकडे सर्वांचे डोळे

  • सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा 'ट्विस्ट'

View All
advertisement