advertisement

Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज

Last Updated:

Gold Rate Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प 2026 च्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. उच्चांकी पातळीवर असलेल्या दरांवर बजेटमधील कर आणि ड्यूटीविषयक निर्णयांचा थेट परिणाम होऊ शकतो.

News18
News18
मुंबई: 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बजेटच्या दिवशी सर्वाधिक नजर ज्या गोष्टीकडे लागणार आहे, ती म्हणजे सोने-चांदीचे दर.
सध्या MCX वर 24 कॅरेट सोने 10 ग्रॅमला सुमारे 1.49 लाख रुपये, तर चांदी 2.91 लाख रुपये प्रतिकिलो या उच्चांकी पातळीवर आहे. मागील बजेटपासून सोने जवळपास 100%, तर चांदी तब्बल 250% महाग झाली आहे. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये सोन्याबाबत काही घोषणा होतात का, याकडे बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार दोघांचे लक्ष आहे.
advertisement
कस्टम ड्यूटीत बदल होणार का?
Financial Express च्या रिपोर्टनुसार, यंदाच्या बजेटमध्ये सोन्यावरील कस्टम किंवा इम्पोर्ट ड्यूटीत मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे.मागील वर्षी सरकारने सोन्यावरील एकूण कस्टम ड्यूटी 15% वरून थेट 6% केली होती. त्यामुळे आयात मोठ्या प्रमाणात वाढली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आयात आधीच विक्रमी पातळीवर असताना सरकार ड्यूटी आणखी कमी करणार नाही. उलट ड्यूटी वाढवली गेली तर दर आणखी उसळी घेऊ शकतात, मात्र सध्या तशी शक्यता कमी मानली जात आहे.
advertisement
बजेटमध्ये सोन्याबाबत नेमका बदल कुठे अपेक्षित?
तज्ज्ञांच्या मते, यंदाच्या बजेटमध्ये सोने खरेदी-विक्रीपेक्षा रिपोर्टिंग आणि डिस्क्लोजरवर अधिक भर दिला जाऊ शकतो.
Income Tax Return (ITR) मधील Schedule AL मध्ये सोन्याच्या दागिन्यांची अधिक सविस्तर माहिती देणे बंधनकारक होऊ शकते
Self-reporting प्रणालीद्वारे गोल्ड होल्डिंग ट्रॅक करण्याचा प्रयत्न
सोने विक्रीवरील कर नियमांमध्ये काही प्रमाणात दिलासा
advertisement
GST मध्ये किरकोळ बदल – making charges वर 5% GST किंवा 3% GST मध्ये सुधारणा
मात्र घरात ठेवलेल्या सोन्यावर कोणतीही हार्ड लिमिट लावली जाणार नाही, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात. जुना Gold Control Act 1990 मध्येच रद्द झाला असून, वैध उत्पन्नातून घेतलेल्या सोन्यावर मर्यादा नाही.
सध्या नियमांनुसार:
विवाहित महिलांसाठी 500 ग्रॅम
अविवाहित महिलांसाठी 250 ग्रॅम
advertisement
पुरुषांसाठी 100 ग्रॅम पर्यंत सोन्यावर सामान्यतः कारवाई होत नाही.
सरकार का टाळणार कडक नियम?
तज्ज्ञ दीपाश्री शेट्टी आणि सोनम चंदवानी यांच्या मते, सरकारचा फोकस घरेलू होल्डिंगवर मर्यादा घालण्याऐवजी पारदर्शकता वाढवण्यावर राहील. जर हार्ड लिमिट लावली गेली, तर लोकांमध्ये भीती निर्माण होईल आणि ब्लॅक मार्केटला चालना मिळू शकते. त्यामुळे सरकार संतुलन राखण्याची भूमिका घेईल.
advertisement
बजेटनंतर सोन्याचे दर पडतील का?
बजेटच्या दिवशी सोन्याच्या दरांची अचूक भविष्यवाणी करणे कठीण आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की:
कोणताही मोठा निर्णय न झाल्यास दर स्थिर राहू शकतात
किरकोळ करेक्शन दिसू शकते
जर ड्यूटी कपातीची अपेक्षा वाढली, तर दरांमध्ये पुन्हा तेजी येऊ शकते
काही अहवालांनुसार जर ड्यूटीत 3–5% कपात झाली (जी शक्यता कमी आहे), तर 10 ग्रॅममागे 2,000 ते 4,000 रुपयांची घसरण होऊ शकते.
advertisement
Budget 2026 मध्ये सोन्यासाठी मोठा धक्का किंवा सरप्राइज मिळण्याची शक्यता कमी आहे. दरांवरचा खरा प्रभाव जागतिक महागाई, भू-राजकीय तणाव आणि सेंट्रल बँकांची खरेदी या घटकांमुळेच राहणार आहे. भारतीय कुटुंबांसाठी सोने हा केवळ दागिना नसून संपत्तीचा आधार आहे. त्यामुळे बजेटनंतर काही काळ करेक्शन दिसले, तरी मध्यम कालावधीत सोन्याची रिकव्हरी होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
Next Article
advertisement
Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • घरातील सोन्याबाबत उद्या होणार मोठा फैसला

  • एका निर्णयाकडे सर्वांचे डोळे

  • सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा 'ट्विस्ट'

View All
advertisement