Sunetra Pawar: अर्थ खातं सुनेत्रा पवार यांच्याकडे का दिलं नाही? भाजपच्या गोटातून कारण समोर, अर्थसंकल्पानंतर...
- Published by:Sachin S
Last Updated:
sunetra pawar maharashtra deputy cm: भाजपकडून याबद्दल कारणही पुढे करण्यात आलं आहे. सुनेत्रा पवार यांचा प्रशासकीय अनुभव नाही. राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मांडला जाणार आहे.
तुषार रुपनवार, प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या पहिल्या महिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांचा राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर अवघ्या दीड तासांमध्ये खाातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ खातं हे भाजपने आपल्याकडे राखलं आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे ३ खााती दिली आहे. पण, लवकरच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, त्यामुळे भाजपने हे खातं आपल्याकडे ठेवल्याचं बोललं जाात आहे.
advertisement
अजित पवार यांच्या निधनानंतर दोनच दिवसांमध्ये राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना वेग आला. अखेरीस मुंबईमध्ये राजभवनावर छोटेखानी काार्यक्रमात सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. सुनेत्रा पवार यांच्याकडे भाजपने लगेच खातेही जाहीर केली. सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क (State Excise Duty), क्रीडा आणि युवक कल्याण (Sports and Youth Welfare). अल्पसंख्याक विकास आणि औकाफ (Minorities Development and Aukaf) या खात्यांची जबाबदारी दिली आहे. पण, सगळ्यात महत्त्वाचं असलेलं अर्थ खात्याची जबाबदारी दिली नाही.
advertisement
भाजपकडून याबद्दल कारणही पुढे करण्यात आलं आहे. सुनेत्रा पवार यांचा प्रशासकीय अनुभव नाही. राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना लगेच अनुभव नसताना खातं देणं जिकिरीचे असेल, असं भाजपला वाटत होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.
तसंच, अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. अशात, शेवटचा हात फिरवताना आणि बदल सुचवायचे असल्याने अडचणीचं गेलं असतं .राष्ट्रवादीसोबत समन्वय राखतच मुख्यमंत्र्यांकडे खातं ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती दिली आहे.
advertisement
दरम्यान, अर्थसंकल्पानंतर पुन्हा एकदा अर्थ आणि नियोजन खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असल्यााचंही सूत्रांनी सांगितलं आहे. पण, अर्थ खातं न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी पसरली आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक वक्तव्य
दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी अर्थसंकल्पाबद्दल सुचक वक्तव्य केलं होतं. 'अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची भरपूर तयारी केली होती. उद्यापासून मी स्वत: अर्थसंकल्पाच्या जी काही प्रक्रिया आहे, त्यात लक्ष घालून जी काही प्रक्रिया आहे, ते पूर्ण करेल. त्यानंतर आम्ही अर्थसंकल्प कोण सादर करणार हे आम्ही एकत्रपणे ठरवू.' अशी प्रतिक्रियाा फडणवीस यांनी दिली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 7:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sunetra Pawar: अर्थ खातं सुनेत्रा पवार यांच्याकडे का दिलं नाही? भाजपच्या गोटातून कारण समोर, अर्थसंकल्पानंतर...










