पत्नीला नवऱ्याचा अभिनय पाहून रडू आवरलं नाही!
या चित्रपटाचा प्रीमियर नुकताच पार पडला, जिथे एक खूपच भावनिक क्षण कॅमेरात कैद झाला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'दशावतार'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ मेननची पत्नी पूर्णिमा नायर चित्रपटाच्या प्रीमियरला हजर होती.
advertisement
चित्रपट संपल्यानंतर पूर्णिमा आपल्या पतीचा अभिनय पाहून इतकी भावूक झाली की, तिला अश्रू आवरता आले नाहीत. तिने सिद्धार्थला मिठी मारली आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. सिद्धार्थ आणि पूर्णिमाचा हा सुंदर व्हिडिओ पाहून सगळ्यांनी 'दशावतार'चं आणि सिद्धार्थच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं आहे.
दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, अभिनय बेर्डे यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. कोकणातील प्रथा, परंपरा आणि दशावतारी नाट्यकला यांचा मिलाफ 'दशावतार'मध्ये बघायला मिळतो.
२ दिवसांत २.२ कोटींची कमाई!
चित्रपट व्यापार विश्लेषक 'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, 'दशावतार'ने पहिल्या दिवशी ५८ लाख रुपयांचा व्यवसाय केला. पण, दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवारी, या कमाईने थेट कोटींचा टप्पा पार केला. चित्रपटाने १.३९ कोटी रुपये कमावले, ज्यामुळे फक्त दोन दिवसांतच जगभरात त्याची कमाई २.२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 'माऊथ पब्लिसिटी'मुळे 'दशावतार'ला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये हा चित्रपट अजून चांगली कमाई करेल असा अंदाज आहे.