काय म्हणाली किरण गायकवाडची आई?
किरण गायकवाडची आई म्हणाली,"पूर्वी बायका मला खूप शिव्या द्यायच्या. किरणची आई तु्म्ही तुमच्या मुलाला कसलं वळण लावलं आहे? तुमचा मुलगा बायकांना मारतो.त्यामुळे मी त्याला घरातच घेतलं नाही. तुझी भीती वाटते असं सांहितलं. मी किरणला म्हणाले होते, तू असं काम का करतो? मी तुझ्यावर असे संस्कार केले आहेत का? तू असं काम नको करू असं मी त्याला सांगितलं होतं. त्यावर किरणने आईला हे माझं काम आहे. ते पात्रं तसं वागणारं आहे, असं सांगितलं होतं".
advertisement
किरणची आई पुढे म्हणाली जेव्हा मला किरणची आई म्हणून ओळखतात तेव्हा मला खूप भारी वाटतं. तसेच किरणच्या स्वप्नपूर्ती होणाऱ्या झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर एक इच्छादेखील व्यक्त केली. मी शाळा शिकलेली नाही पण मला मालिकेत काम करायचं आहे, असं किरणची आई म्हणलाी. तसेच त्यांना खडूस, खतरणाक काम करायचं असल्याही त्या म्हणाल्या. किरणच्या आईचा हा साधेपणा उपस्थितांना चांगलाच भावला आहे.