हेमा मालिनी ट्वीट काय?
हेमा मालिनी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,"जे घडत आहे ते अक्षम्य आहे! जबाबदार माध्यमांनी जी व्यक्ती उपचार घेत आहे, ज्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशा व्यक्तीबद्दल खोटी बातमी पसरवणे हे कितपत योग्य आहे? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि गैरजबाबदार वर्तन आहे. कृपया त्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आणि त्यांच्या भावना यांचा आदर करा".
advertisement
हेमा मालिनी यांनी याआधीदेखील धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. हेमा पत्रकारांसोबत बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या होत्या,"धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत". तर दुसरीकडे रात्री उशीरा सनी देओलच्या टीमने माहिती दिली होती की,"धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. पुढील अपडेट्स मिळताच आम्ही शेअर करू. सर्वांना विनंती आहे की, त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा आणि कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा".
धर्मेंद्र यांचा 8 डिसेंबर 2025 रोजी 90 वा वाढदिवस आहे. याआधी, यंदाच्या एप्रिल महिन्यात त्यांच्यावर डोळ्यांवर ग्राफ्ट ऑपरेशन करण्यात आले होते. धर्मेंद्र यांनी सन 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी ‘अनपढ’, ‘बंदिनी’, ‘अनुपमा’, ‘आया सावन झूम के’ अशा चित्रपटांमध्ये सर्वसामान्य माणसाची उठावदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली.
