शनाख्त हा चित्रपट फारसा चालला नाही पण सेटवर घडलेला एक प्रसंग आजही चर्चेत असतो. हा किस्सा खुद्द दिग्दर्शक आणि अभिनेता टीनू आनंद यांनी एका मुलाखतीत शेअर केला आहे. रेडिओ नशा या शोमध्ये टीनू आनंद यांनी सांगितलं की, एका सीनमध्ये अमिताभ बच्चन यांना काही गुंड मारत असतात. त्या वेळी माधुरीला पुढे येऊन असं म्हणायचं होतं, "एक बाई तुमच्या समोर उभी आहे, तरीही तुम्ही साखळ्यांनी बांधलेल्या माणसाला का मारताय?"
advertisement
( हात-पाय थरथरत होते, घाम फुटला, जुही-माधुरीला KISS करताना अभिनेत्याची झाली वाईट अवस्था )
टीनू आनंद यांनी या सीनसाठी माधुरीला सांगितलं की तिला ब्लाउज काढून फक्त ब्रा मध्ये सीन शूट करावा लागेल. त्यांच्या मते त्या सिचुएशनचं इमोशन दाखवण्यासाठी हे आवश्यक होतं. ते म्हणाले की, “तिला कोणत्याही गोष्टीमागे लपवणार नाही.”
माधुरीचा नकार आणि सेटवरचा गोंधळ
माधुरीने पहिल्यांदा होकार दिला पण जेव्हा शूटिंगचा दिवस आला तेव्हा ती सेटवर आलीच नाही. टीनू आनंद तिच्या घरी गेले, तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. टीनू म्हणाले, "हा सीन करावाच लागेल, नाहीतर शूटिंग बंद करा." पण माधुरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिली.
बिग बीनींनी घेतली माधुरीची बाजू
यानंतर टीनू आनंद यांनी ही गोष्ट अमिताभ बच्चन यांना सांगितली. तेव्हा बिग बीने टीनूला सांगितलं, "तिला त्रास होत असेल, तर तू वाद का करतो आहेस?" अमिताभने माधुरीची बाजू घेतली आणि हा वाद मिटला.
शेवटी शूटिंग झालं, पण चित्रपट मात्र अयशस्वी ठरला
नंतर माधुरीच्या मॅनेजरने कळवलं की, ती सीनसाठी तयार आहे. शेवटी सीन शूट झाला. चित्रपट फारसा चालला नाही पण हा किस्सा आजही लक्षात राहिलेला आहे.