'लाखात एक आमचा दादा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिशा परदेशी. मालिकेच्या निमित्तानं दिशा दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. सोशल मीडियावर दिशाची चांगली फॅन फॉलोविंग आहे. दिशानं नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिशा मनसोक्त नाचनाता दिसतेय. दिशाचा डान्सनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
ना धांगड धिंगाणा, ना वेस्टर्न साँग्स... दिशानं थेट अहिरणी गाण्यावर ठेक्यावर ठरला. दिशानं तिच्या स्टाइलनं मनसोक्त नाचताना दिसतेय. वेस्टर्न कपड्यात दिशा फार कम्फर्टेबल नाचतेय. तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच ती किती खुश आहे हे सांगून जात आहे.
When I am 100% me असं कॅप्शन देत दिशानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. दिशाचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. अनेक कलाकारांनीही तिच्या या डान्सचं कौतुक केलं आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, तुझ्या या डान्सला मिलियन्स व्ह्यू मिळायला हवेत. ते तू डिझर्व करतेस. तर अनेकांनी जय खान्देश, लव्ह फ्रॉम खान्देश असं म्हणत दिशाच्या व्हिडीओला पसंती दिली आहे.
दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, ती झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत काम करत होती. पण तिने प्रकृतीच्या कारणास्तव मालिकेतून एक्झिट घेतली. त्याचबरोबर तिने मालिकेच्या टीमवर देखील आरोप केले होते. तिची तब्येत ठीक नसताना टीमने तिला सपोर्ट न केल्याचं तिनं सांगितलं होतं.
मालिका सोडल्यानंतर दिशा कोणत्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. दिशा आतापर्यंत मुसाफिरा, प्रेम पहिलं वहिलं सारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. मध्यंतरी तिचं कन्याकुमारी हे गाणं देखील खूप लोकप्रिय झालं होतं.
