फोटोत दिसणारी रेखाच्या कुशीतील ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून अनन्या पांडे आहे. हे वाचून तुम्हालाही विश्वास बसला नाही ना? कारण लहापनपणी आणि आता तिच्यात खूप बदल झाला आहे.
ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला, 'मी गप्प राहिलो...'
रेखा आणि अनन्या पांडेच्या एका जुन्या फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'उमराव जान' या रेखाच्या क्लासिक चित्रपटाच्या पुन्हा प्रदर्शित झालेल्या स्क्रिनिंगदरम्यान हा फोटो चर्चेत आला. अनन्या पांडेने स्वतः हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती अगदी लहान वयाची असून रेखाच्या मांडीवर बसलेली दिसते.
advertisement
रेखाने काळा कोट घातलेला असून केसांचा अंबाडा बांधलेला आहे, आणि तिच्या मांडीवर गोंडस छोटी अनन्या हसतमुख चेहऱ्याने दिसत आहे. या फोटोसह अनन्याने लिहिलं, “रेखा आंटींसाठी… पहा, काहीही बदललेलं नाही.”
अनन्या पांडे आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, विजय देवरकोंडा अशा अनेक स्टार्ससोबत काम केलं आहे. पण जेव्हा ती अजून बाळ होती, तेव्हा ती रेखाच्या मांडीवर खेळत होती, हे पाहून नेटकरी भारावले आहेत. एकाने लिहिलं, “ही तर एक जादुई फ्रेम आहे”, तर दुसऱ्याने लिहिलं, “भूतकाळ आणि वर्तमान एकत्र दिसतंय.”
