Abhishek Bachchan: ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला, 'मी गप्प राहिलो...'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Abhishek Bachchan-Aishwarya Rai Divorce Rumours: अलीकडच्या काही महिन्यांमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या नात्याबाबत अनेक अफवा आणि चर्चांना उधाण आलं होतं. आता अभिषेकने यावर मौन सोडलं आहे.
मुंबई : बॉलिवूडमधील एक शांत, संयमी आणि कुटुंबकेंद्री चेहरा म्हणजे अभिषेक बच्चन. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये त्याच्या आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या नात्याबाबत अनेक अफवा आणि चर्चांना उधाण आलं होतं. विभक्त होणार? एकत्र राहत नाहीत? अशा वेगवेगळ्या अफवा होत्या. मात्र दोघांनी यावर कधीही भाष्य केलं नाही किंवा स्पष्टीकरण दिलं नाही. अखेर अनेक महिन्यांनंतर आता अभिषेकने यावर मौन सोडलं आहे.
आता अभिषेकने एका मुलाखतीत आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिषेक म्हणाला, "पूर्वी माझ्याबद्दल काहीही लिहिलं गेलं तरी त्याचा माझ्यावर परिणाम होत नव्हता. पण आता मी एक पती, एक बाप आहे. माझं कुटुंब आहे. त्यांच्याशी संबंधित खोट्या बातम्या वाचून मी अस्वस्थ होतो.” त्याच्या म्हणण्यानुसार, नकारात्मक बातम्यांकडे लोक जास्त आकर्षित होतात. "मी काहीही स्पष्ट केलं तरी लोक ऐकणार नाहीत. त्यांना फक्त सनसनाटी गोष्टी हव्या असतात," असंही त्याने स्पष्ट केलं.
advertisement
अभिषेकने असाही एक अनुभव शेअर केला की एकदा एका ट्रोलने त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर अपमानास्पद कमेंट केली होती. यावर त्याचा मित्र आणि अभिनेता सिकंदर खेरने तीव्र प्रतिक्रिया दिली आणि ट्रोलला थेट समोर येण्याचे आव्हान दिले. यावर अभिषेक म्हणाला, “डिजिटल जगात बसून कोणीही काहीही लिहितं. पण तुम्ही समोर येऊन तेच सांगितलं, तर मी तुमचा आदर करीन. कारण त्यात प्रामाणिकपणा असतो.”
advertisement
व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर अभिषेक लवकरच 'कालिधर लपटा' या थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 4 जुलै रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 30, 2025 12:55 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Abhishek Bachchan: ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला, 'मी गप्प राहिलो...'










