Shweta Tiwari: 'BF ला म्हणायची भाऊ', श्वेता तिवारीचं अफेअर, EX नवऱ्याचे शॉकिंग खुलासे
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Shweta Tiwari Affair: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांमुळेही नेहमीच चर्चेत राहिली आहे.
मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांमुळेही नेहमीच चर्चेत राहिली आहे. दोन विवाह आणि दोन्ही अयशस्वी झाल्यानंतर आता ती एकटीच दोन्ही मुलांना वाढवत आहे. अलीकडेच तिचा पहिला पती राजा चौधरी याने एका मुलाखतीत काही गंभीर आणि धक्कादायक दावे केले आहेत. श्वेताच्या अफेअरविषयी त्याने शॉकिंग खुलासा केला.
श्वेता तिवारीच्या एक्स नवरा राजा चौधरीने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले. राजा चौधरी म्हणतो की, श्वेता तिवारीने तिचा दुसरा पती अभिनव कोहली याला सुरुवातीला “भाऊ” म्हटले होते. त्यानंतर त्यांचं प्रेमसंबंध आणि नंतर लग्न झालं. राजा म्हणतो, “तो तिचा भाऊ होता. ती अनेकांना भाऊ म्हणायची. नंतर तो नवरा झाला. ही फारच विचित्र गोष्ट होती.”
advertisement
यापेक्षाही अधिक धक्कादायक दावा म्हणजे राजा चौधरीचा असा आरोप की श्वेताने दुसऱ्या लग्नानंतरही एका तिसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू केलं. त्यावेळी अभिनव कोहली याने स्वतः राजा चौधरीकडे जाऊन आपली व्यथा सांगितली होती. राजा म्हणतो, “तो (अभिनव) रडत माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘तुझ्या घटस्फोटाच्या काळात मी श्वेताच्या आयुष्यात आलो. आता माझ्यासोबतही तेच घडतंय.’”
advertisement
श्वेताला पहिल्या लग्नातून पलक तिवारी ही मुलगी आहे, जी सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या लग्नातून तिला एक मुलगा आहे. या मुलाच्या ताब्यावरून श्वेता आणि अभिनवमध्ये अजूनही वाद सुरू आहे. अभिनवचा आरोप आहे की श्वेता त्याला मुलाला भेटू देत नाही, तर राजाचा दावा आहे की त्याला मुलीपासून दूर ठेवलं जातं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 29, 2025 1:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shweta Tiwari: 'BF ला म्हणायची भाऊ', श्वेता तिवारीचं अफेअर, EX नवऱ्याचे शॉकिंग खुलासे


