TRENDING:

Movies : दसऱ्याला बॉक्स ऑफिसवर महाक्लॅश, 'हे' 4 बिग बजेट चित्रपट करणार तांडव!

Last Updated:

Box Office Clash : मनोरंजनप्रेमींसाठी 2025 चा दसरा खूप खास ठरणार आहे. ऑक्टोबर महिन्यात सिनेमागृहांमध्ये अ‍ॅक्शनपासून कॉमेडीपर्यंतचा जबरदस्त तडका पाहायला मिळणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपट शुक्रवारी नव्हे तर गुरुवारी, म्हणजेच 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहेत. चला तर पाहूया कोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Dussehra Box Office Clash : यंदाचा दसरा सिनेप्रेक्षकांसाठी खूपच खास असणार आहे. गेल्या काही दिवसांत विविध विषयांवर भाष्य करणारे अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहेत. बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट धुमाकूळ घालत आहेत. अशातच यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर आणखी काही चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे यंदाच्या दसऱ्याला प्रेक्षकांना डबल धमाका मिळणार आहे. यंदा शुक्रवारी नव्हे तर दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होत आहेत. दसऱ्याची सुट्टी आणि लाँग वीकेंडचा या चित्रपटांना चांगलाच फायदा होणार आहे. या आठवड्यात सिनेप्रेमींची पाऊले सिनेमागृहाकडे वळणार आहेत. 2 ऑक्टोबर 2025 रोजी चित्रपटांचा चांगलाच धमाका होणार आहे. यात मराठी, हिंदीपासून विविध भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे.
News18
News18
advertisement

कांतारा चॅप्टर 1

ऋषभ शेट्टीचा बहुचर्चित 'कांतारा चॅप्टर 1' हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. ऋषभ शेट्टीनेच या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. 'कांतारा' फ्रैंचायझीचा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात रुक्मिणी वसंतदेखील दिसणार आहे.

जे अमिताभला जमलं नाही ते काजोलने करून दाखवलं, दुर्गा पंडालमध्ये दिसलं जया बच्चन यांचं वेगळंच रुप; VIDEO

advertisement

सनी संस्कारी की तुलसी कुमारी

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा रोमँटिक-विनोदी चित्रपट आहे. रोहित सराफ (विक्रम) आणि सान्या मल्होत्रा यांच्या लग्नाभोवती हा चित्रपट फिरतो. या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचीही प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे.

निक्का जैलदार 4

'निक्का जैलदार 4' हा पंजाबी चित्रपट आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना विनोदासह एक वेगळं नाट्य पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात पंजाबी गायक-अभिनेता अमी विर्क आणि सोनम बाजवा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात मद्यप्रेमी असणारी मुलगी आणि मद्य पसंत नसलेल्या मुलाची गोष्ट दाखविण्यात आली आहे.

advertisement

वडापाव

'वडापाव' या बहुचर्चित मराठी चित्रपटाचीही प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. 'वडापाव' हा प्रसाद ओकचा 100 वा चित्रपट आहे. प्रसाद ओक, सविता प्रभुणे, अभिनव बेर्डे, गौरी नलावडे आणि रसिका वेंगुर्लेकर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एक जबरदस्त लव्हस्टोरी प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळेल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Movies : दसऱ्याला बॉक्स ऑफिसवर महाक्लॅश, 'हे' 4 बिग बजेट चित्रपट करणार तांडव!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल