TRENDING:

सुपरस्टार अभिनेत्याचा आलिशान hummer चालवताना भीषण अपघात, VIDEO आला समोर

Last Updated:

अपघात झाल्याची आणखी एक घटना घडली असून यामध्ये तमिळ अभिनेता अजित कुमार यांना मोठी दुखापत झाली. या अपघाताचे काही धक्कादायक व्हिडीओ समोर आले असून पाहूनच अंगावर काटा येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेकदा कलाकारांसोबत अपघात घडतात. यामध्ये बऱ्याचदा कलाकारांना दुखापत होते तर काही वेळा गंभीर जखमाही होतात. जवळपास प्रत्येक शूटिंगमध्ये काही ना काही असं घडतचं. असाच अपघात झाल्याची आणखी एक घटना घडली असून यामध्ये तमिळ अभिनेता अजित कुमार यांना मोठी दुखापत झाली. या अपघाताचे काही धक्कादायक व्हिडीओ समोर आले असून पाहूनच अंगावर काटा येईल.
सुपरस्टार अभिनेत्याचा आलिशान hummer चालवताना भीषण अपघात
सुपरस्टार अभिनेत्याचा आलिशान hummer चालवताना भीषण अपघात
advertisement

तमिळ अभिनेता अजित कुमार यांचा शुटिंग सुरु असताना मोठा अपघात झाला. चित्रपटासाठी कार स्टंट शूट करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि गाडी पलटी झाली. ही घटना खूपच थरारक होती आणि अपघाताची दृश्ये व्हायरल होतायेत.

Baba Vengas Prediction: पुढच्या 8 महिन्यात येणार मोठी संकटं, बाबा वेंगानं केली होती भविष्यवाणी!

advertisement

अजित यांची आगामी फिल्म 'विडामुयार्ची' याचं शुटिंग सुरु असताना हा अपघात घडला. @vasutheatre नावाच्या X अकाऊंटवर या अपघाताचे फूटेज शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अभिनेत्याचा कारवरील नियंत्रण सुटतं आणि कार पलटी होते. कारमध्ये अजित यांच्यासोबत आणखी एक कलाकार होता. त्याचं नाव अर्णव किजर. त्यानं ट्विट करत देवाच्या कृपेनं आम्ही वाचलो आणि या संकटातून सुखरुप बाहेर आलो असं सांगितलं.

advertisement

दरम्यान, कंपनीनं त्यांच्या जास्त मेहनतीसाठी त्यांचं कौतुक केलं आहे. अजित यांचे चाहतेही त्यांच्या अपघातानंतर चिंतेत आले होते. मात्र ते सुदैवानं त्यांना जास्त काही दुखापत झाली नाही.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
सुपरस्टार अभिनेत्याचा आलिशान hummer चालवताना भीषण अपघात, VIDEO आला समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल