लव इन वियतनाम : 'लव इन वियतनाम' हा रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटात 'टिकू वेड्स शेरू' फेम अभिनेत्री अवनीत कौर आणि 'गंगूबाई काठियावाडी' फेम अभिनेता शांतनु माहेश्वरी मुख्य भूमिकेत आहे.
जुगनुमा : मनोज बाजपेयी यांचा 'जुगनुमा' हा चित्रपटही आज प्रदर्शित होत आहे. भावनात्मक चित्रपटातील संगीत खूपच कमाल आहे. मनोजसह या चित्रपटात प्रियंका बोस, दीपक डोबरियाल आणि हीरल सिद्धू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
मिराई : 12 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'मिराई' या वैज्ञानिक चित्रपटाचाही समावेश आहे. कार्तिक गट्टामेनी आणि अनिल आनंद दिग्दर्शित या चित्रपटात तेजा सज्जा आणि मंचू मनोज मुख्य भूमिकेत आहेत. करण जौहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
हीर एक्सप्रेस : कौटुंबिक चित्रपट पाहणाऱ्यांसाठी 'हीर एक्सप्रेस' हा अतिशय योग्य चित्रपट आहे. दिव्या जुनेजा, प्रीत कमानी, आशुतोष राणा आणि गुलशन ग्रोवर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मनु क्या करेगा : संजय त्रिपाठी दिग्दर्शित 'मनु क्या करेगा' या चित्रपटात व्योम यादव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या रोमँटिक-विनोदी चित्रपटात कुमुद मिश्रा, विनय पाठक आणि साची बिंद्रा मुख्य भूमिकेत आहेत.
आरपार : अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता ललित प्रभाकर यांचा 'आरपार' हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. गौरव पत्कीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पहिली झलक आऊट झाल्यापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता होती. सिनेमातील गाण्यालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.
दशावतार : महेश मांजरेकर आणि दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार' या चित्रपटात प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रील, ड्रामासह बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. पिढ्यानपिढ्या रंगभूमीवर झळकलेली गाथा प्रेक्षकांना आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
एक चतुर नार : 'एक चतुर नार' हा विनोदी चित्रपट आहे. दिव्या खोसला कुमार आणि नील नितिन मुकेश या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता.